एआयसीटीईचा मोठा निर्णय, अभियांत्रिकी अभ्यासासाठी गणित, भौतिक आणि रासायनशास्त्र आवश्यक नाही
अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी बारावीमध्ये किमान 45 टक्के गुणांची आवश्यकता असेल आणि 14 विषयांच्या यादीतील तीन विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल. (AICTE’s big decision, engineering studies don’t require math, physics and chemistry)
नवी दिल्ली : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी अभ्यासासाठी बारावीतील गणित, भौतिक आणि रसायनशास्त्र अनिवार्य विषय रद्द केले आहेत. एआयसीटीईने अभियांत्रिकी अभ्यासासाठी आपल्या नियमांमध्ये सुधारणा केली असून, बारावीत गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांचे अनिवार्य विषय रद्द केले. हा निर्णय सर्व प्रकारच्या अभियांत्रिकी अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (AICTE’s big decision, engineering studies don’t require math, physics and chemistry)
गणित-भौतिक विषयांची आवश्यकता नाही
या वर्षापासून, बारावीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र न शिकणारे विद्यार्थीही अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. एआयसीटीईच्या सुधारीत नियमांनुसार विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी बारावीमध्ये किमान 45 टक्के गुणांची आवश्यकता असेल आणि 14 विषयांच्या यादीतील तीन विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल. सुधारीत नियमांमध्ये तांत्रिक नियमांच्या 14 विषयांमध्ये भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, जीवशास्त्र, माहितीशास्त्र सराव, बायोटेक्नॉलॉजी, तांत्रिक व्यावसायिक विषय, अभियांत्रिकी ग्राफिक्स, व्यावसायिक अभ्यास, उद्योजकता या विषयांचा समावेश आहे.
विविध पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात गणित, भौतिक, अभियांत्रिकी ड्राईंग इ. सारखे योग्य अभ्यासक्रम असतील. आतापर्यंत बी.ई., बी.टेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीमध्ये गणित व भौतिक विषय आवश्यक होते, पण आता ते अनिवार्य केले गेले आहे. एआयसीटीईच्या नवीन नियम पुस्तकानुसार, आता पदवीपूर्व अभियांत्रिकी अभ्यासक्रम आणि तंत्रज्ञान महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी बारावीमध्ये अनिवार्य गणित आणि भौतिक विषय असणार नाहीत. 2020-21 शैक्षणिक वर्षामध्ये विविध पार्श्वभूमीचे विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास सक्षम असतील.
नमूद विषयांपैकी तीन विषयांची निवड करावी लागेल
वास्तविक, अभियंता पदवीधर प्रवेशासाठी पात्रता निकष बदलला आहे. जे विद्यार्थी बारावीत गणित व भौतिक विषय अभ्यासक्रमात घेतले नाहीत ते अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात. या संदर्भात, एआयसीटीईने त्यांची मंजुरी प्रक्रिया पुस्तिका 2021-22 प्रकाशित केली आहे. आतापर्यंत अभियांत्रिकीचे पदव्युत्तर अभ्यासक्रम बीई / बीटेकसाठी गणित आणि भौतिकशास्त्र सक्तीचे विषय होते. आता विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक, आयटी, माहिती अभ्यास, व्यवसाय अभ्यास आदी विषयांपैकी तीन विषयांची निवड करावी लागेल. आरक्षण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी बारावीमध्ये 40 टक्के गुण आवश्यक असतील तर जनरल प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 45% गुण मिळवणे आवश्यक आहे. (AICTE’s big decision, engineering studies don’t require math, physics and chemistry)
Tanushree Dutta | ‘आशिक बनाया आपने’वर तनुश्री दत्ताचा दमदार डान्स, मनोरंजन विश्वात पुन्हा धमाका करण्यास तयार, पाहा Video#TanushreeDutta | #AashiqBanayaAapne | #DanceVideo | #bollywood | #Entertainment https://t.co/pZcYUaFKyz
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 12, 2021
इतर बातम्या
महागडी घरं, जमीन आणि कार्यालय स्वस्तात मिळवा; ‘या’ सरकारी बँकेची जबरदस्त ऑफर
RBI च्या निर्णयाने IDBI बँकेची चांदी, गुंतवणूकदारांना फायदाच फायदा