संपूर्ण फी माफीसाठी AISF चं मुंबई आझाद मैदानावर आंदोलन, विद्यार्थ्यांवर पोलिसांची कारवाई

कोरोना काळातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संपूर्ण फी माफी करावी या मागणीसाठी आज (5 जुलै) ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने (AISF) मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केलं.

संपूर्ण फी माफीसाठी AISF चं मुंबई आझाद मैदानावर आंदोलन, विद्यार्थ्यांवर पोलिसांची कारवाई
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 5:30 PM

मुंबई : कोरोना काळातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संपूर्ण फी माफी करावी या मागणीसाठी आज (5 जुलै) ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने (AISF) मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केलं. यावेळी त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 29 जून 2019 रोजी जाहीर केलेली शैक्षणिक शुल्कात सवलत तोकडे आणि अपुरी असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी विविध मागण्या केल्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाई करत ताब्यात घेतलंय. विद्यार्थ्यांना डी बी रोड सायबर पोलीस ठाणे येथे ठेवण्यात आले (AISF protest in Mumbai for fee waiver of students amid Corona situation).

आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या काय?

एआयएसएफचे राज्याध्यक्ष विराज देवांग म्हणाले, “उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 29 जून 2019 रोजी जाहीर केलेली शैक्षणिक शुल्कात सवलत तोकडे आणि अपुरी आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमालीची खराब आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाने विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. ओबीसी एससी एसटी विद्यार्थ्यांची फडणवीस सरकारच्या काळात रद्द केलेली फ्रीशिप योजना पूर्ववत करावी. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा त्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात याव्यात.”

“एमपीएससी परीक्षा तात्काळ घ्या, भरती प्रक्रियाही पूर्ववत करा”

“या व्यतिरिक्त कोरोना काळातील शैक्षणिक कर्जाचे हप्ते माफ करण्यात यावे, महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी शैक्षणिक संस्था प्रवेश शुल्क यांचे नियमन कायदा 2015 यातील विद्यार्थी विरोधी तरतुदी तात्काळ रद्द कराव्या. त्यासंबंधी अध्यादेश काढावा. एमपीएससी परीक्षा तात्काळ घेण्यात याव्यात. तसेच विविध भरती प्रक्रिया राज्यात तात्काळ पूर्ववत कराव्यात. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले,” अशी माहिती विद्यार्थी संघटनेने दिलीय.

“विद्यार्थी प्रतिनिधी शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करून विद्यार्थी व पालकांना संघटित करण्यात येईल,” असा इशारा ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे (AISF) राज्याध्यक्ष विराज देवांग व राज्य सचिव प्रशांत आंबी यांनी दिलाय.

हेही वाचा :

‘विद्यार्थ्यांची 50 टक्के नाही, तर संपूर्ण फी माफ करा,’ मागणीसाठी AISF विद्यार्थी संघटना मुंबईत धडकणार

व्हिडीओ पाहा :

AISF protest in Mumbai for fee waiver of students amid Corona situation

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.