विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सर्व परीक्षा आता ऑफलाईनच, 12वी मेरीटबाबतही मोठा निर्णय

बारावीच्या परीक्षेबाबतही उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली. शेवटच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि निकाल लवकर लावावेत अशा सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सर्व परीक्षा आता ऑफलाईनच, 12वी मेरीटबाबतही मोठा निर्णय
CUET PG 2022Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 9:13 AM

मुंबई : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन (Exam Offline) होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी परीक्षांबाबत शुक्रवारी मोठं विधान केलं आहे. कोरोनाचं संकट आता निवळलंय. त्यामुळे विद्यापीठाांच्या परीक्षा यापुढे ऑफलाईनच घेण्यात येणार आहेत, असं उदय सामंत यांनी म्हटलंय. कोरोनामध्ये सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं झाल्या. शिक्षणही ऑनलाईनच सुरु होतं. दरम्यान, आता शाळा आणि कॉलेज पूर्ण क्षमतेनं सुरु झालेत. त्यानंतरही काही विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली होती. आता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार नसल्यानं विद्यार्थ्यांना (Student Exam) ऑफलाईन परीक्षेला सामोरं जावं लागमार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना वेळ अपुरी पडू नये, यासाठी काही परीक्षांसाठी वेळ वाढवून देण्यात आली होती. परीक्षेआधी प्रश्नपत्रिकाही देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र अखेरीस आता सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन होतील, असं उदय सामंत यांनी म्हटलंय.

ऑफलाईनच…

वेगवेगळ्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑफलाईन घेऊ नयेत, यासाठी आंदोलन केलं होतं. निदर्शनं देखील करण्यात आली होती. सुरुवातील या विद्यार्थ्यांची मागणी ग्राह्य धरत काही प्रमाणात ऑनलाईन सवलही परीक्षांमध्ये देण्यात आलेली. दरम्यान, आता सर्वच गोष्टी पूर्ण क्षमतेनं सुरु झाल्यानं परीक्षादेखील ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

निकाल लवकर लागणार..

बारावीच्या परीक्षेबाबतही उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली. शेवटच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि निकाल लवकर लावावेत अशा सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बारावीचे विद्यार्थी हे अनेकदा सीईटी परीक्षेच्या स्पर्धेत बारावीच्या मुख्य अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करतात असंही निदर्शनास आलं आहे. याचा विचार करुन पुढच्या वर्षीपासून मेरटीसाठी बारावी आणि सीईटी असे प्रत्येकी पन्नास टकेक गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनीही असा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे आता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मेरीटसाठी हीच पद्धत ग्राह्य धरली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

येत्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 1 सप्टेंबरपासून करण्याचा प्रयत्न असल्याचीही माहिती उदय सामंत यांनी दिली. त्याचप्रमाणे अनेक कॉलेजमध्ये मराठीतून अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेला आहे. इंजिनिअरींगच्या मराठी अभ्यासक्रमाला विद्यार्थी चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहितीदेखील उदय सामंत यांनी दिली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.