प्रेरणादायी! थॅलेसेमियाने ग्रस्त, पैसे नाही! संकटांनी घेरलेल्या अमृतचं बारावीत घवघवीत यश!
अवघ्या 17 वर्षांमध्ये आयुष्यात अनेक चढउतार बघणाऱ्या मुलाचे नाव अमृत सिंग चावला असे आहे, तो एचआर काॅलेजचा विद्यार्थी आहे. त्याने बारावी कॉमर्समध्ये 82.67 मिळवले आहेत. मानसिक तणावात गेलेल्या अमृतला नैराश्यावर उपचार घ्यावे लागले तसेच त्याला थॅलेसेमिया आणि श्रवणदोष देखील आहे. वडिलांची नोकरी गेल्यावर आर्थिक स्थिती खराब झाली आणि अमृतचे रक्त संक्रमण थांबले.
मुंबई : असं म्हणतात ना जेंव्हा आपण एखादी गोष्ट आयुष्यामध्ये (Life) करायची ठरवतो, तेंव्हा ती पूर्ण करण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. फक्त यासाठी कष्ट करण्याची तयारी आपली हवी. मग परिस्थिती (Situation) कोणतीही असो त्यावर विजय फक्त आपलाच असतो. याचे एक ज्वलंत उदाहरण नुकताच समोर आले. मुंबईमध्ये राहणाऱ्या एका 17 वर्षाच्या मुलाने परिस्थितीसमोर हार न मानता परिस्थितीवर मात करत बारावीमध्ये 82 टक्के मार्क्स मिळले आहेत. हा मुलगा 17 वर्षांमध्ये अनेक समस्यांना (Problem) सामोरे गेलाय. न कळत्या वयामध्येच त्याची आई त्याला सोडून गेली, त्यानंतर फक्त वडिलांनीच याचे संगोपन केले. मात्र, परिस्थितीला हे अजिबात मान्य नव्हते. कोरोनाच्या काळामध्ये वडिलांचीही नोकरी गेली आणि पैशांची चणचण निर्माण झाली.
वडिलांची नोकरी गेल्यामुळे आर्थिक स्थिती झाली खराब
अवघ्या 17 वर्षांमध्ये आयुष्यात अनेक चढउतार बघणाऱ्या मुलाचे नाव अमृत सिंग चावला असे आहे, तो एचआर काॅलेजचा विद्यार्थी आहे. त्याने बारावी कॉमर्समध्ये 82.67 मिळवले आहेत. मानसिक तणावात गेलेल्या अमृतला नैराश्यावर उपचार घ्यावे लागले तसेच त्याला थॅलेसेमिया आणि श्रवणदोष देखील आहे. वडिलांची नोकरी गेल्यावर आर्थिक स्थिती खराब झाली आणि अमृतचे रक्त संक्रमण थांबले. त्यानंतर सतत अमृतची प्रकृती खराब होत होती. कोवळ्या वयात अमृत असताना त्याच्या आईने घर सोडले होते आणि अमृतने अभ्यास करणेच बंद केले.
पेपरच्या आदल्यादिवशी अमृत होता दवाखान्यात
अमृत हा अगोदरपासूनच हुशार विद्यार्थी होता. अमृतने शिक्षण बंद केल्यामुळे एचआर कॉलेजचे माजी प्राध्यापक यांनी अमृतला समजावून सांगत परत एकदा शिक्षणाची गोडी निर्माण करून दिली. 12 वीच्या महत्वाच्या वर्षीच अमृतची तब्येत खालावली. परीक्षेच्या आदल्यादिवशी अमृत बऱ्याच वेळा हाॅस्पीटलमध्येच असायचा. अमृतच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन अत्यंत कमी असल्यामुळे त्याला सतत उपचार घेण्यासाठी दवाखान्यामध्ये जावे लागत असतं. वडिलांची नोकरी गेल्यामुळे कुटुंबावर कर्जाचा डोंगर आहे. अमृतचा छोटा भाऊ सिकलसेल पॉझिटिव्ह आहे आणि त्याला नोड्सचा कर्करोग आहे. यासंदर्भात Indiatimes.com ने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.