अकरावीच्या प्रवेशाचे नियोजित वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तपशीलवार माहिती
प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी होईल. तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीऐवजी प्रतीक्षा यादी करण्याचे नियोजन असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी 23मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत सुरू राहील.
पुणे – राज्यात दरवर्षी दहावीच्या निकालानंतर (SSC result) अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया राबवली जाते. मात्र यंदा 2022-23 मधील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. येत्या 1 ते 14 मे दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज ऑनलाइन (Online Application )पद्धती कसा भरायचा याचा सराव करता येणार आहे. 17 मे पासून प्रत्यक्ष अर्ज भरणे, अर्ज पडताळणीची सुरु होणार आहे. अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. शिक्षण मंडाळाने आगामी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधीच्या मार्गदर्शक सूचना , संभाव्य वेळापत्रक (Possible schedule) परिपत्रकाद्वारे जाहीर केल्या आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक या महापालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते.
अशी राबवली जाईल प्रक्रिया
- शिक्षण मंडळाच्या निर्णयानुसार प्रवेश प्रक्रियेमध्ये निकाल जाहीर होण्यापूर्वी 17 मेपर्यंत प्रवेश अर्जाचा भाग 1 भरला जाईल.
- दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया राबवली जाईल.
- निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून, महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे.
- गुणवत्ता यादी जाहीर करणे, प्रत्यक्ष प्रवेश देणे या प्रक्रिया पारपडल्या जाणार आहेत.
या संकेतस्थळावर पाहा माहिती
प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी होईल. तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीऐवजी प्रतीक्षा यादी करण्याचे नियोजन असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी 23मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत सुरू राहील. प्रवेश प्रक्रियेची माहिती https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
तयारी सुरु करावी
अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे टप्पे समजावून घेऊन त्यानुसार नियोजन करावे. पालक विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग, शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करावे. विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याबाबत संबंधित यंत्रणेस विनंती करावी, अशा सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिल्या आहेत.
Sangli Sabha : सांगलीत महापालिका महासभेत प्रचंड गदारोळ, महिला नगरसेवकांनी राजदंड पळवला
Sangli Sabha : सांगलीत महापालिका महासभेत प्रचंड गदारोळ, महिला नगरसेवकांनी राजदंड पळवला