आश्रमशाळेचे शिक्षक कर्मचारी संकटात, 8 महिन्याचं वेतन रखडलं, बीडमध्ये उपोषण

संतशिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळा वडझरी ता. पाटोदा जिल्हा बीड येथील शिक्षक आणि कर्मचाऱ्याचे पगार गेल्या आठ महिन्यांपासून रखडले आहेत. या कर्मचाऱ्यांनी वेतन मिळावं म्हणून आता आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.

आश्रमशाळेचे शिक्षक कर्मचारी संकटात, 8 महिन्याचं वेतन रखडलं, बीडमध्ये उपोषण
शिक्षकांचं आंदोलन
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 1:24 PM

बीड: कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊनचा सर्वांना फटका बसलेला आहे. नोकरदार ते छोटे मोठे व्यावसायिक देखील यातून सुटलेले नाहीत. कोरोनामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली असताना संतशिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळा वडझरी ता. पाटोदा जिल्हा बीड येथील शिक्षक आणि कर्मचाऱ्याचे पगार गेल्या आठ महिन्यांपासून रखडले आहेत. या कर्मचाऱ्यांनी वेतन मिळावं म्हणून आता आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. बुधवारपासून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे.

8 महिन्यांचं वेतन रखडलं

पाटोदा तालुक्यातील वडझरी येथील संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळेचे तब्बल आठ महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे शिक्षक आक्रमक झाले आहेत. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत बेमुदत आमरण उपोषण सुरु केलं आहे. उपोषणाच्या या आंदोलनानंतर तरी शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागणार का पाहावं लागणार आहे.

समाज कल्याण विभागाला वारंवार विनंती

आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा समाजकल्याण विभागाला विनंती करूनही वेतन मिळाले नसल्याने शिक्षकांनी समाजकल्याण आयुक्त कार्यालयासमोर अन्नत्याग अमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे.

नेमक्या काय आहेत मागण्या?

  1. जानेवारी 2021 पासून नियमित वेतन मिळणे व पुढेही दरमहा वेतन मिळावे
  2. सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळणे
  3. सातव्या वेतना आयोगाचा रोखीचा पहिला व दुसरा हप्ता खात्यावर जमा करणे
  4. जुलै 2020 ते जुलै 2021 ची वार्षिक वेतनवाढ मिलणे
  5. सन 2-17-18 च्या संचमान्यतेनुसार अतिरीक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन तात्काळ करणे
  6. 2018-19 आणि 2019-20 ची संचमान्यता करणे
  7. सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक नियुक्ती देणे
  8. जून 2020 पासूनचे शाळेतील सीसीटीव्ही फुटेज अथवा सर्व कर्मचारी यांचे शाळेवरील मोबाईल लोकेशन घेऊन गैरहजर दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु कऱण्यात आलं आहे.

सामाजिक न्यायमंत्री याकडे लक्ष देणार?

महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातीलच आहेत. आश्रमशाळेच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाची दखल घेत धनंजय मुंडे समजाकल्याण विभागाला कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडवण्यासंदर्भाता आदेश देतात का हे पाहावं लागणार आहे. सामाजिक न्यायमंत्र्यांनी यासंदर्भातील आदेश दिल्यास शिक्षकांना दिलास मिळण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

भाजप फार महान पक्ष, परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करू शकतो; राऊतांनी उडवली खिल्ली

SECL Recruitment 2021: साऊथ इस्टर्न कोलफील्डस लिमिटेडमध्ये भरती, क्लार्कपदी नोकरी मिळवण्याची संधी

Beed Patoda Ashramshala teachers and other employee started protest four due salary of eight months

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.