दहावी-बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय!

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेत दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती.

दहावी-बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय!
विद्यार्थी
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 10:16 AM

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेत दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. मात्र, असे असताना देखील दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे तर दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेदरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. (Big decision of the state government for the disabled students of 10th-12th)

या वेळापत्रकात कोणताही दिव्यांग ,अपंग विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये. यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं परिपत्रक काढून राज्यातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना लेखनिक व वाचनिकाची सोय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील एकही दिव्यांग विद्यार्थी हा परीक्षेपासून वंचित राहणार नाही.

यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ अशोक भोसले यांनी या संदर्भातील आदेश काढून राज्यातील शाळांना सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीसाठी हे पत्र काढण्यात आले आहे. कोरोना माहामारीमुळे देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

देशात तसेच राज्यात सर्व शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करता आला नाही. तसेच, तास न झाल्यामुळे शिक्षकांना पूर्ण अभ्यासक्रमही शिकवता आला नाही. हा विचार करुन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जुलै महिन्यात इयत्ता 10 आणि 12 वीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के अभ्यासक्रम कपातीचा निर्णय घेतला होता.

संबंधित बातम्या : 

CBSE परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत नाहीच, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच, 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होणार

नापास विद्यार्थ्यांनाही दहावी-बारावीत प्रवेशाची संधी, व्हिडिओ कॉलवर तोंडी परीक्षा

(Big decision of the state government for the disabled students of 10th-12th)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.