धर्मेंद्र प्रधान यांच्याकडं शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी, कोरोनाच्या सावटातून शिक्षण क्षेत्राला बाहेर काढण्याचं आव्हान

रमेश पोखरियाल निशंक यांनी प्रकृतीचं कारण राजीनामा दिल्यानं त्यांच्याकडील शिक्षण मंत्रालयाचा कारभार आता धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे देण्यात आला आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्याकडं शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी, कोरोनाच्या सावटातून शिक्षण क्षेत्राला बाहेर काढण्याचं आव्हान
धर्मेंद्र प्रधान
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 7:29 PM

नवी दिल्ली: पतंप्रधान नरेंद्र मोदी (Modi Cabinet Expansion) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhariyal Nishank) यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. रमेश पोखऱियाल निशंक यांनी त्यासाठी प्रकृतीचं कारण दिलं आहे. धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्याकडील पेट्रोलियम खात्याचा कार्यभार काढून घेत त्यांना केंद्रीय शिक्षण मंत्रिपद देण्यात आलं आहे. (BJP Leader Dharmendra Pradhan is new Education Minister of India)

1998 पासून भाजपशी संबंधित

धर्मेंद्र प्रधान हे ओडिशामधील राजकारणी आहेत. ते भाजपचे माजी खासदार डॉ. देवेंद्र प्रधान यांचा सुपुत्र आहेत. महाविद्यालयीन जीवनापासून ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत होते. तालचेरमध्ये विद्यार्थ्यी संघाचे ते अध्यक्ष झाले होते. उत्कल विद्यापीठ भुवनेश्वर येथून त्यांनी एम.ए. पूर्ण केलं होतं. 1998 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ओडिशा विधानसभेकडून त्यांना गौरवण्यात आलं होतं.

धर्मेंद्र प्रधान यांनी पल्ललहारा विधानासभा मतदरासंगातून 2000 मध्ये राजकीय जीवनाला सुरुवात केली. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. 2000-2004 पर्यंत त्यांनी विविध पदांवर काम केलं. धर्मेंद्र प्रधान 14 व्या लोकसभेत निवडून आले होते. बिहार आणि मध्यप्रदेशातून ते राज्यसभा खासदार देखील झाले. पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयात त्यांनी राज्यमंत्री जबाबदारी पार पाडली होती. 2019 ला केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर प्रधान यांना केंद्रीय मंत्रिमंडळात पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.

धर्मेंद्र प्रधान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी , अमित शाह यांचे निकटवर्तीय मानलं जातं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बिहारची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती.

धर्मेंद्र प्रधान यांच्यासमोरील आव्हानं

कोरोना विषाणू संसर्गाच्या महामारीत शाळा बंद आहेत. काही ठिकाणी परीक्षा झालेल्या आहेत काही ठिकाणी परीक्षा झालेल्या नाहीत. नीट आणि जेईई यासारख्या परीक्षांचं आयोजन व्हायचं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्यावर ही जबाबदारी आहे. येत्या काही दिवसांमध्ये सीबीएसई परीक्षेचे निकाल देखील जाहीर होणार आहेत. कोरोनामुळं शिक्षणाचं बदललेलं स्वरुप पाहता धर्मेंद्र प्रधान यांच्या समोर अनेक आव्हानं असणार आहेत.

इतर बातम्या

25 वर्षांपासून क्षीरसागरांची एक हाती सत्ता, नगरपालिकेने महावितरणाचं बिल थकवलं, बीड अंधारात, शिवसंग्रामचं आंदोलन

लै पुण्य लागल ब्वा… नांदेडच्या अवलियाची रुग्णसेवा, समाजाला ‘नको’ असलेल्या उपेक्षितांचा ‘कायापालट’!

(BJP Leader Dharmendra Pradhan is new Education Minister of India)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.