UGC : UGC: एकाचवेळी घ्या 2 डिग्र्या! काय आहे नवा निर्णय? तुमच्यासाठी फायदेशीर?
आधी पूर्णवेळ पदवीचं शिक्षण घेत असताना अर्धवेळ पदवीच्या शिक्षणाला परवानगी होती. पण आता दोन पूर्णवेळी पदव्या घेण्याचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना देण्यात आलंय. यासंदर्भातली घोषणा करताना आयोगाकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत
मुंबई : एकाचवेळी दोन पदव्या, एकाचवेळी दोन वेगवेगळ्या शाखांमधल्या पदव्या घेण्यास विद्यार्थ्यांना (Students) यापूर्वी अडचणी येत होत्या. तशी परवानगी (Permission)नव्हती. पण आता मात्र अशा पद्धतीचं शैक्षणिक स्वातंत्र्य (Freedom) विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने एकाचवेळी दोन पदव्या घेण्याची परवानगी दिलीये. याबाबतची घोषणा काल (12 एप्रिल) करण्यात आलीये. आज यासंदर्भातली नियमावली आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आधी पूर्णवेळ पदवीचं शिक्षण घेत असताना अर्धवेळ पदवीच्या शिक्षणाला परवानगी होती. पण आता दोन पूर्णवेळी पदव्या घेण्याचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना देण्यात आलंय. यासंदर्भातली घोषणा करताना आयोगाकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत आणि काही अपेक्षा व्यक्त करण्यात आलेल्या आहेत.
आयोगाकडून काही सूचना त्या खालीलप्रमाणे…
- आता एकाचवेळी विद्यार्थ्यांना दोन पूर्णवेळ अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे.
- आता एकाचवेळी 1) दोन पदविका 2) दोन पदवी 3) एक पदव्युत्तर पदवी आणि एक पदवी असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध होणार आहेत.
- दोन वेगवेगळ्या विद्यापीठातून किंवा एकाच विद्यापीठाने असा पर्याय उपलब्ध करून दिल्यास एकाच विद्यापीठातून या दोन पदव्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करणं शक्य.
- तासिकांवर आधारित असणाऱ्या अभ्यासक्रमांसाठीच ही मुभा आहे. संशोधनावर आधारित असणाऱ्या जसं कि एम.फिल किंवा पी.एचडी साठी ही मुभा नाही.
- दोन्ही अभ्यासक्रम शिक्षण संस्थांमध्ये प्रत्यक्ष प्रवेश (ऑफलाइन) घेऊन पूर्ण करता येतील. जिथे आपण दोन अभ्यासक्रमांसाठी प्रत्यक्ष प्रवेश घेणार असू अशा शिक्षणसंस्था एकाच शहरातील असाव्यात.
- दोन्ही अभ्यासक्रम एक प्रत्यक्ष आणि एक ऑनलाइन किंवा दोन्ही ऑनलाईन पद्धतीनं करता येईल. या दोन शिक्षणसंस्था वेगवेगळ्या राज्यात असू शकतात. पण अशावेळी या अभ्यासक्रमाच्या तासिकांची वेळ एकत्र असू नये.
- एक अभ्यासक्रम सकाळच्या सत्रात, दुसरा सायंकाळच्या सत्रात असावा त्यानुसार शिक्षणसंस्थांची निवड करण्यात यावी.
- या सगळ्यासाठी विद्यापीठाची परवानगी असणं आवश्यक असणार आहे.
- दोन विद्यापीठं एकमेकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांसाठी पर्याय उपलब्ध करून देऊ शकतात.
ही नवी पद्धत आपल्या विद्यापीठात लागू करायची की नाही, प्रवेशाचे नियम, हजेरीचे नियम, वेळापत्रक यासंदर्भातील सगळे अधिकार विद्यापीठांना असणार आहेत.
इतर बातम्या :