CAT 2021 Registration : मॅनेजमेंट प्रवेशाच्या कॅट परीक्षेसाठी नोंदणीचा उद्या शेवटचा दिवस, अर्ज कुठे करायचा?

व्यवस्थापन अभ्यासाक्रमांसाठी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामान्य प्रवेश परीक्षेसाठी CAT 2021 नोंदणी 4 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झाली होती. या परीक्षेसाठी नोंदणीची प्रक्रिया उद्या म्हणजेच 15 सप्टेंबर 2021 रोजी संपणार आहे.

CAT 2021 Registration : मॅनेजमेंट प्रवेशाच्या कॅट परीक्षेसाठी नोंदणीचा उद्या शेवटचा दिवस, अर्ज कुठे करायचा?
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 5:03 PM

नवी दिल्ली: व्यवस्थापन अभ्यासाक्रमांसाठी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामान्य प्रवेश परीक्षेसाठी CAT 2021 नोंदणी 4 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झाली होती. या परीक्षेसाठी नोंदणीची प्रक्रिया उद्या म्हणजेच 15 सप्टेंबर 2021 रोजी संपणार आहे. भारतीय व्यवस्थापन संस्थेत म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये (IIM) मध्ये प्रवेश मिळवायचा आहे, ते विद्यार्थी अर्ज करू शकतात. या परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर भेट द्यावी लागेल.

CAT परीक्षा कधी?

आयआयएम अहमदाबादद्वारे 28 नोव्हेंबर 2021 रोजी सामान्य प्रवेश परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. ही परीक्षा सीबीटी म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड असेल. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन ही परीक्षा घेतली जाईल. परीक्षेच्या अधिकृत सूचनेनुसार ही परीक्षा तीन सत्रांमध्ये घेतली जाईल.

CAT 2021 आणि परीक्षेसाठी अर्ज कसा करावा

समान्य प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी त्यांची महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करुन सोबत ठेवणं आवश्यक आहे. मार्कशीट, फोटो आणि सही स्कॅन करुन अपलोड करावी लागणार असल्यानं ते स्कॅनिंग करुन जेपीजे स्वरुपात सोबत ठेवावं.

अर्ज कुठे करायचा?

स्टेप 1: अधिकृत वेबसाइट – iimcat.ac.in वर भेट द्या. स्टेप 2: होमपेजवरील, ‘नवीन नोंदणी’ लिंक वर क्लिक करा. स्टेप 3: तुमचा ईमेल आयडी, फोन नंबर आणि जन्मतारीख याद्वारे लॉगिन करा. स्टेप 4:लॉगिन केल्यानंतर अर्जातील माहिती भरा. स्टेप 5:आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. स्टेप 6: अर्जाचं शुल्क भरुन अर्ज सादर करा स्टेप 7: भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची एक प्रत डाउनलोड करा

परीक्षा शुल्क किती?

कॅटसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रवेश शुल्क देखील भराव लागणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना 1,100 रुपये तर इतर सर्व प्रवर्गासाठी 2,200 रुपये शुल्क भरावं लागेल.

नीट परीक्षा संपन्न 202 शहरात परीक्षा

राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट यूजी 2021 परीक्षा रविवारी पार पडली. नीट यूजी परीक्षेचं आयोजन देशभरातील आणि परदेशातील 202 शहरातील केंद्रावर करण्यात आलं. परीक्षेसाठी 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होतं. परिक्षेचं आयोजन दुपारी 2 ते 5 च्या दरम्यान केलं गेलं. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.

बीडमध्ये 24 केंद्रावर परीक्षा

बीड मध्ये देखील एकूण 24 सेंटरवर या परीक्षा होती, निवडल्या गेलेल्या संस्थांनी याची तयारी पूर्ण केली होती. सकाळी 11 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आलाय होता. सलग दुसऱ्या वर्षी कोविडच्या सावटात विद्यार्थी परीक्षा दिल्या. दरम्यान याच पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत या परीक्षा संपन्न झाली.

इतर बातम्या:

NEET UG 2021 : नीट परीक्षा यूजी परीक्षेच्या प्रवेशपत्रावर केंद्राचा चुकीचा उल्लेख, विद्यार्थ्यांना मनस्ताप

NEET UG 2021: नीट यूजी परीक्षेला आजपासून सुरुवात, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

CAT 2021Registration closes tomorrow on iimcat.ac.in check here how to apply

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.