Scholarship 2021: कोरोनामुळं पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची घोषणा, वाचा सविस्तर
स्पर्धा परीक्षेपासून ते शालेय स्तरावरील अभ्यासक्रम, सर्व गरजू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीशी जोडले जाईल. कॅटॅलिस्ट या नामांकित ई-लर्निंग संस्थेने विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली: कॅटॅलिस्ट ग्रुपने कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक गमावले त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. जे विद्यार्थी UPSC, GATE, IBPS, CA, CS, NET, IIT-JEE, NEET या परीक्षांची तयारी करत आहेत. जे विद्यार्थी शाळेत शिकतात आणि कोरोना विषाणूमुळे त्यांचे पालक गमावले आहेत. या शिष्यवृत्तीद्वारे मदत दिली जाणार आहे.
शाळा ते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
स्पर्धा परीक्षेपासून ते शालेय स्तरावरील अभ्यासक्रम, सर्व गरजू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीशी जोडले जाईल. कॅटॅलिस्ट या नामांकित ई-लर्निंग संस्थेने विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅटॅलिस्ट हा सरकारी कर्मचारी, वरिष्ठ प्राध्यापक, लेखक आणि शिक्षकांचा एक गट आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय आणि प्रगती साठी त्यांच्याकडून काम करण्यात येतं.
ज्या विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे आपले पालक गमावले आहेत आणि जे विद्यार्थी साथीच्या आजारामुळे आर्थिक अडचणींमुळे त्रस्त आहेत. ते विद्यार्थी कोणत्याही स्पर्धा किंवा शासकीय परीक्षेच्या तयारीसाठी स्वतःची नावनोंदणी करू शकतात. शाळा, पदवी, पदव्युत्तर किंवा पीएचडी अशा विविध परीक्षा देणाऱ्यांची देखील शिष्यवृत्तीसाठी निवड होऊ शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीवर आधारित 100% शिष्यवृत्ती देखील दिली जाईल. ही योजना फक्त पुढील 3 महिन्यांसाठी असेल. कॅटॅलिस्ट संस्थेकडून एकूण 2 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली आहे.
शिष्यवृत्तीचा लाभ कसा घ्यावा?
शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी आधार कार्डची स्कॅन केलेली प्रत, पालकांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, पालकांचं मृत्यू प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला सादर करणं आवश्यक आहे. याशिवाय पालकांची इन्कम टॅक्स किंवा जीएसटी रिटर्नची कागदपत्रं यासहं कॅटॅलिस्ट ग्रुपच्या वेबसाइट thecatalystgroup.info वर माहिती सादर करणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रं
आधार कार्ड पालकांचे आधार कार्ड नोंदणीकृत मोबाईल नंबर तुमच्या पालकाचा/पालकांचा कोविड अहवाल उत्पन्न प्रमाणपत्र वेतन किंवा आयकर तपशील मृत्यू प्रमाणपत्र (मृत्यू प्रमाणपत्र)
इतर बातम्या:
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी ओमानमध्ये दाखल, लॅंडिंगला परवानगी नाकारल्याने आखाती देशात पोहचले
3 लाख गुंतवून हा व्यवसाय सुरू करा, दरमहा 7 लाखांपेक्षा जास्त कमाई करा, जाणून घ्या कशी?
Catalyst Group declared Scholarship 2021 for Covid Affected Students who loss their parents during Corona period