CBSE 12th Board Exam 2021: बारावी परीक्षेविषयीची बैठक संपली, उच्चस्तरीय बैठकीत नेमकं काय ठरलं?
बारावीच्या परीक्षा जून महिन्याच्या शेवटी आयोजित करण्याबाबत उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. CBSE 12th Board exams 2021
CBSE 12th Board Exam 2021नवी दिल्ली: भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांची, शिक्षण सचिवांची आणि राज्य परीक्षा बोर्डांच्या अध्यक्षांची बैठक पार पडली आहे. सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे भूषवलं आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि प्रकाश जावडेकर देखील या बैठकीला उपस्थित होते. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhariyal Nishank) यांनी ही उच्च स्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याबाबत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. बारावीच्या परीक्षा जून महिन्याच्या शेवटी आयोजित करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. (CBSE 12th Board exams 2021 all updates of High Level Meeting chaired by Rajnath Singh over exam of class 12th )
बारावी परीक्षा जून महिन्याच्या शेवटी?
उच्चस्तरीय बैठकीत बारावीच्या परीक्षा जून महिन्याच्या शेवटी आयोजित करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट आणि इतर रोगांचं वाढत प्रमाण पाहत परीक्षा नेमकी कधी होणार याबाबत साशंकता आहे. केंद्रीय शिक्षणमंत्रालयाकडून याविषयी अधिकृत सांगण्यात आलेलं नाही. बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकताना त्यावेळी 1 जूनला परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर करु, असं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून कळव्यात आलं होतं. आता,तेव्हा केलेल्या घोषणेनुसार पाहिलं असता. 15 जूनपूर्वी बारावीच्या परीक्षांचं आयोजन शक्य नाही.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेसंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत सहभाग घेतला. ही बैठक सीबीएसईतर्फे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी, किंवा कशी घ्यावी याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्य म्हणून आम्ही सहभाग घेतला. बैठकीत काही पर्यायांवर चर्चा झाली त्याबद्दल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या संदर्भात चर्चा करु. बारावीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा बघूनचं यासंदर्भातील निर्णय व्हावेत, अशी भूमिका मांडल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
कोरोना परिस्थितीचा विचार करण्याचा सल्ला
कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेबद्दल आपल्याला माहिती आहे की, जसं सांगितलं जातेय की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जादा धोका असल्याचं वर्तवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 14 लाख आहे.तर, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची संख्या 25 हजार आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना सुरुक्षित वातावरणात केली पाहिजे.
बारावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करा
नवी दिल्लीचे शिक्षणमंत्री यांनी उच्च स्तरीय बैठकीत बारावीच्या परीक्षा घेण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचं लसीकरण करुन घ्यावं, अशी मागणी केली. लसीकरणासाठी केंद्रानं फायजर कंपनीसोबत बोलावं. असा प्रस्ताव देखील मनीश सिसोदिया यांनी मांडला.
Centre should talk to Pfizer to explore vaccination for Class 12 students: Manish Sisodia at meeting on board exams
— Press Trust of India (@PTI_News) May 23, 2021
संबंधित बातम्या:
(CBSE 12th Board exams 2021 all updates of High Level Meeting chaired by Rajnath Singh over exam of class 12th)