सीबीएसई बारावी कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर! अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा, निकाल डाऊनलोड करा
अधिकृत वेबसाइटशिवाय, विद्यार्थी डिजिलॉकरवरून (Digi Locker) आपला निकाल डाउनलोड करू शकतात.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बारावी कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई – results.cbse.nic.in ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी निकाल तपासू शकतात. रोल नंबर (Roll Number) आणि जन्मतारखेच्या मदतीने तुम्ही निकाल तपासू शकता. सीबीएसई टर्म-2 परीक्षेनंतर जुलै 2022 मध्ये अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. अधिकृत वेबसाइटशिवाय, विद्यार्थी डिजिलॉकरवरून (Digi Locker) आपला निकाल डाउनलोड करू शकतात.
सीबीएसई बोर्डाने 23 ऑगस्ट 2022 रोजी बारावीची कंपार्टमेंट परीक्षा घेतली. त्याचबरोबर दहावीची परीक्षा 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2022 या कालावधीत घेण्यात आली होती. दहावीचा निकालही लवकरच जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
CBSE 12 वी कंपार्टमेंटचा निकाल कसा तपासायचा
- निकाल तपासण्यासाठी सर्वप्रथम सीबीएसई – results.cbse.nic.in अधिकृत वेबसाइटवर जा.
- वेबसाइटच्या होम पेजवर 2022 च्या निकालाच्या पर्यायावर क्लिक करा
- यानंतर सीनियर स्कूल सर्टिफिकेट कंपार्टमेंट एक्झामिनेशन (बारावी) निकाल 2022 च्या लिंकवर क्लिक करा.
- आता पुढील पेजवर रोल नंबर आणि शाळा क्रमांक यासारखी माहिती भरून लॉगइन करा.
- लॉग इन करून निकाल उघडेल.
- निकाल तपासल्यानंतर प्रिंट आऊट काढा.
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल
यंदा सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल 22 जुलै रोजी लागला. कोविड १९ मुळे ही परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली. यंदा एकूण नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख ४४ हजार ३४१ इतकी होती. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख ३५ हजार ३६६ इतकी होती. निकालानंतर १३ लाख ३० हजार ६६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या वर्षी एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 92.71% होती.