CBSE Results 2023 : CBSE इयत्ता 12वीचा निकाल लागला, टॉपर कोण?, संपूर्ण निकाल पटापट जाणून घ्या
CBSE 12th Results 2023: सीबीएसई बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीच्या परीक्षेत एकूण 87.33% टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 12वी बोर्डाचा निकाल जाहीर केला आहे. बारावीच्या परीक्षेत एकूण ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट, results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाकावी लागेल. CBSE चा निकाल ऑनलाइन कसा तपासायचा ते तुम्ही खाली पाहू शकता.
मुलींनी मारली बाजी
यंदा 12 वी च्या परीक्षेसाठी 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थी बसले होते. थोड्याच वेळापूर्वी जाहीर झालेल्या निकालात एकूण 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 5 टक्के कमी आहे. त्रिवेंद्रम झोनने 99.91 टक्क्यांसह सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यंदा मुलींचा निकाल मुलांपेक्षा चांगला लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 6 टक्के चांगला लागला आहे. मुलांचा निकाल 84.67 टक्के, तर मुलींचा निकाल 90.68 टक्के लागला आहे.
कसा चेक कराल रिझल्ट ?
- रिझल्ट चेक करण्यासाठी results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- होम पेजवर CBSE 10th Result Direct Link’ किंवा ‘CBSE 12th Result Direct Link’ वर क्लिक करा.
- लॉग इन पेज उघडल्यानंतर तेथे तुमचा रोल नंबर आणि जन्मदिनांक नोंदवा.
- तुमचा सीबीएसई बोर्डाचा रिझल्ट स्क्रीनवर ओपन होईल. तुम्ही तो चेक करू शकता.
- तेथून तुम्ही रिझल्टची कॉपी डाऊनलोड करून तुमच्या जवळ ठेऊ शकता.