CBSE 12th Result 2022 Updates : आता घरबसल्या मिळणार सीबीएसई प्रमाणपत्र अन् गुणपत्रिकाही, नेमकी कशी आहे प्रक्रिया?

विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये शिवाय त्यांना पुढची प्रक्रिया सोईस्कर व्हावी म्हणून बोर्डाकडून योग्य ती पावले उचलली जात आहेत. त्यामुळे निकाल लागताच त्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्रही मिळावे अशी सोय करण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) इंटरमिजिएट आणि मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांना डिजिलॉकर खात्यांच्या (CBSE Digital Locker accounts) लिंकच्या माध्यमातून त्यांच्या गुणपत्रिका आणि इतर कागदपत्रे घरबसल्या डाउनलोड करण्याची संधी आहे.

CBSE 12th Result 2022 Updates : आता घरबसल्या मिळणार सीबीएसई प्रमाणपत्र अन् गुणपत्रिकाही, नेमकी कशी आहे प्रक्रिया?
cbse 12th result 2022
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 11:01 AM

मुंबई : गतमहिन्यात (CSBE) सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या टर्म 2 (Board Exam) बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याचा (Result) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून आता विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना आता घरबसल्या निकाल तर पाहता येणार आहेच शिवाय प्रमाणपत्र आणि गुणपत्रकही मिळणार आहे. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत cbse.gov.in, cbseresults.nic.in आणि results.cbse.nic.in भेट देऊन आपला निकाल लगेच तपासता येणार आहे. बोर्डाच्या या सोई-सुविधेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय तर टळणारच आहे पण वेळेचीही बचत होणार आहे. दरम्यानच्या काळात इतर शैक्षणिक काम ओटापून घेण्यास मोठा हातभार लागणार आहे.

विद्यार्थ्यांची होणार सोय

विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये शिवाय त्यांना पुढची प्रक्रिया सोईस्कर व्हावी म्हणून बोर्डाकडून योग्य ती पावले उचलली जात आहेत. त्यामुळे निकाल लागताच त्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्रही मिळावे अशी सोय करण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) इंटरमिजिएट आणि मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांना डिजिलॉकर खात्यांच्या (CBSE Digital Locker accounts) लिंकच्या माध्यमातून त्यांच्या गुणपत्रिका आणि इतर कागदपत्रे घरबसल्या डाउनलोड करण्याची संधी आहे. शिवाय डिजिटल अॅक्सेसची सुरक्षा लक्षात घेता विद्यार्थ्यांना 6 अंकी सेक्युरिटी पिनही देण्यात आला आहे. त्यामुळे हे सुरक्षित तर राहणार आहे पण विद्यार्थ्यांच्या सोईच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

शाळेतून दिलेला पिन महत्वाचा

परिक्षार्थ्यांना शाळेने दिलेल्या पिनच्या माध्यमातून गुणपत्रक मिळण्याचा मार्ग अधिक सोईस्कर होणार आहे. विद्यार्थी हे शाळेशी संपर्क करुन हा पिन मिळवू शकतात. शिवाय सीबीएसईने जारी केलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे की, हा प्रकल्प एनईजीडीच्या सहकार्याने पूर्ण झाला आहे.विद्यार्थ्यांनी घरबसल्या निकाल पाहून गुणपत्रक कसे मिळवावे याची प्रक्रिया ही सोप्या भाषेत देण्यात आली आहे.

नेमकी कशी आहे प्रक्रिया?

CBSE 10th, 12th चे विद्यार्थी हे घरबसल्या आणि अगदी सहज गुणपत्रिका हे डाऊनलोड करु शकणार आहेत. त्यासाठी बोर्डाने दिलेली प्रक्रिया पाहणे गरजेच आहे. सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे. येथील होमपेजवरच ‘Security PIN for DigiLocker accounts of Class X and XII students to access their Digital Academic Documents’ या लिंकवर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर पुढची स्टेप

2. नोटीस बोर्ड ओपन होईल तिथे ‘cbseservices.digilocker.gov.in/activatecbse’ या लिंकवर क्लिक करावं लागेल.

3. यावर ‘Get Started with Account Confirmation’या लिंकवर क्लिक करावे लागणार आहे.

4. यामध्ये स्कूल कोड, रोल नंबर आणि शाळेने दिलेला तो 6 अंकी सिक्युरिटी पिन टाकावा लागणार आहे.

5. विद्यार्थ्यांना नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी मिळेल, तो टाकावा लागणार आहे.

6. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपले डिजिलॉकर खाते सक्रिय केले जाणार आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.