CBSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या, निकाल कसा लागणार? विद्यार्थी पालकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे
सीबीएसई पाठोपाठ आयसीएसई बोर्डानं देखील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. CBSE board class 12th exam cancelled
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आयसीएसई या बोर्डाने देखील बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यासोबतच हरियाणा राज्य सरकारने देखील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कोरोना संकटात संकटात होणाऱ्या परीक्षेमुळे चिंतेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, बारावीचा निकाल कसा लागणार? कार्यपद्धती कशी असेल? बारावीनंतरची प्रवेश प्रक्रिया कशी असेल याबद्दल काय निकष असतील, असे विविध प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत. (CBSE board class 12th exam cancelled students need more details of decision and evaluation patterns)
बारावीच्या परीक्षा होणार का?
कोरोना संसर्गामुळे यापूर्वी दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यावेळी बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. राज्य सरकारं, पालक, विद्यार्थी यांच्या विरोधानंतर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्या वर्षी बारावीच्या परीक्षा होणार नाहीत.
परीक्षा झाली नाही तर विद्यार्थी पास कसे होणार?
आता जर विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही तर विद्यार्थी पास कसे होतील हा देखील एक प्रश्न आहे. सीबीएसईने आत्तापर्यंत बारावीच्या परीक्षांसाठीचा कोणताही फॉर्म्युला जाहीर केलेला नाही. सरकारने हा निर्णय परीक्षा बोर्डावर सोपवलेला आहे. मात्र, बारावीच्या परीक्षातील अंतर्गत मूल्यमापनच्या आधारे निकाल जाहीर केला जाऊ शकतो.
निकाल कशाच्या आधारे लागणार?
सीबीएससी बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी एक फॉर्म्युला तयार केला होता. त्यानुसार 20 नोव्हेंबरला झालेल्या इंटरनल असेसमेंटचे मध्ये मिळालेले गुण यासोबतच दुसऱ्या पेपरमधील गुणांच्या आधारे निकाल जाहीर केला जाईल असं, दहावीसाठी सांगितलं होतं. मात्र, सीबीएसईने बारावीसाठी फायनल फॉर्म्युला बनवलेला नाही.
परीक्षा रद्द मात्र परीक्षा द्यायची असल्यास?
कोरोना संकटामुळे केंद्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ,एखाद्या विद्यार्थ्याला पेपर किंवा परीक्षा द्यायची असेल तर त्याला तो पर्याय दिला जाईल. कोरोनाची स्थिती ज्यावेळेस सामान्य होईल त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल.
निकालावर समाधानी नसल्यास?
सीबीएसई बोर्डाकडून तयार करण्यात आलेल्या फॉर्म्युलावर एखादा विद्यार्थी समाधानी असल्यास त्याच्याकडे निकालाविरोधात अपील करण्याचा पर्याय असेल. अशा वेळी विद्यार्थी लेखी परीक्षा देऊ शकतात. याबाबत सीबीएसई कडून लवकरच कार्यप्रणाली जाहीर केली जाईल.
पुढील प्रवेश कसे होणार?
बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना ॲडमिशन कसे मिळणार, त्यांचे वर्ष वाया जाणार का? यासंदर्भात त्यांच्या मनामध्ये चिंता आहे. केंद्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकते. काही विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत सुरू असते त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण येण्याची शक्यता नाही.
प्रवेश प्रवेश परीक्षा होणार का?
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना काही ठिकाणी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. अशा वेळी बारावीचे निकाल उशिरा आल्यामुळे प्रवेश परीक्षा देखील उशिरा होऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागत असलेल्या अभ्यासक्रमांना अॅडमिशन घ्यायचे त्यांनी त्यांच्या अभ्यासाची तयारी सुरू करावी.
परदेशात जाण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय?
बारावीनंतर काही विद्यार्थी परदेशातील अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतात. तिथे जुलै-ऑगस्ट दरम्यान नव्या सत्राची सुरुवात होते, या वर्षी देखील त्याबाबत तयारी सुरू झाली आहे. परदेशी शाळा महाविद्यालयातील प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत असतात. त्यामध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला तर तुम्हाला बारावीचा रिझल्ट द्यावा लागतो. यावर्षी बारावीच्या निकालाला उशीर लागणार याची शक्यता आहे. मात्र, परीक्षा रद्द झाल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकतो.
सीबीएसई सोबत आणखी कोणत्या बोर्डाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला?
सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आयसीएसई बोर्ड, हरियाणा राज्य सरकारने देखील त्यांच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.तर महाराष्ट्र, राजस्थानचा निर्णय दोन दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे.
पालकांची प्रतिक्रिया
कोरोना विषाणू संसर्गामुळे चिंतेत असणाऱ्या पालकांसाठी ही दिलासा देणारी गोष्ट आहे. कोरोना रुग्णसंख्या थोडीशी घटली असली तरी पालक आणि विद्यार्थी चिंतेमध्ये होते. मात्र, परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. मात्र, पुढील प्रवेशाबाबत थोडीशी चिंता त्यांना लागून राहिलेली आहे.
संबंधित बातम्या:
CBSE Board 12 Exam cancelled: बारावीच्या परीक्षा रद्द, मोदी सरकारचा मोठा निर्णय
(CBSE board class 12th exam cancelled students need more details of decision and evaluation patterns)