नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं 10 वीच्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विशेष मूल्यांकन सूत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या निकालावर समाधानी नसलेल्या, खासगी आणि श्रेणी सुधारणा करण्यासाठी बोर्डाने घेतलेल्या ऑफलाइन विशेष परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in. Cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.
सीबीएसईकडून दहावीची कंपार्टमेंट परीक्षा 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली होती. त्यापूर्वी सीबीएसईनं 3 ऑगस्टला दहावीचा नियमित निकाल जाहीर केला होता. कोरोना विषाणू संसर्गाच्या लाटेमुळं दहावीचा निकाल मूल्यांकन सूत्रानुसार जाहीर करण्यात आल्यानंतर 17363 विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट मिळालं होतं.
स्टेप 1: सीबीएसईची वेबसाईट cbseresults.nic.in ला भेट द्या.
स्टेप 2: लेटेस्ट अपडेट सेक्शन वर क्लिक करा तिथे रिझल्ट लिंक वर क्लिक करा.
स्टेप 3: आता डाऊनलोड रिझल्ट लिंक पर क्लिक करा.
स्टेप 4: लॉगिन पेजवर रोल नंबर आणि जन्मतारीख नोंदवा.
स्टेप 5: यानंतर निकाल उपलब्ध होईल, तो डाऊनलोड करा.
CBSE 10 वी निकाल पाहण्यासाठी अनेक आहेत. यामध्ये डिजीलॉकर, SMS, ई मेल, उमंग मोबाईल अॅप, आयव्हीआरएस याद्वारे निकाल पाहू शकता.
डिजीलॉकर एक ऑनलाईन क्लाऊड सॉफ्टवेअर आहे. यामध्ये आपण निकाल चेक करुन मार्कशीटही डाऊनलोड करु शकता. त्यासाठी तुम्हाला डिजीलॉकर वेबसाईटवर जाऊन ‘View result’ वर क्लिक करा. तिथे तुमचा रोल नंबर टाका, क्लास निवडा आणि अॅडमिट कार्ड टाका. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. विद्यार्थ्यांना निकाल डाऊनलोड करुन प्रिंटही काढता येऊ शकेल.
विद्यार्थी SMS नेही आपला निकाल पाहू शकतात. मोबाईलवरुन spacespace हा तपशील भरुन 7738299899 या नंबरवर SMS करा. निकाल जाहीर झाल्यानंतर यावर निकाल मिळू शकेल. याशिवाय IVRS द्वारेही निकाल ऐकायला मिळू शकतो. त्यासाठी 011-24300699 नंबरवर कॉल करा.
सीबीएसईकडून 12 वी कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं 12 वीच्या विशेष परीक्षेचा निकाल 29 सप्टेंबरला जाहीर केला होता. विशेष मूल्यांकन सूत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या निकालावर समाधानी नसलेल्या, खासगी आणि श्रेणी सुधारणा करण्यासाठी बोर्डाने घेतलेल्या ऑफलाइन विशेष परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. सीबीएसईनं सुप्रीम कोर्टात कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल 30 सप्टेंबरपर्यंत जाहीर करण्याचं प्रतिज्ञापत्र दिलं होतं.
इतर बातम्या:
NEET: पुन्हा परीक्षा घ्या…! नीट यूजी परीक्षेतील गैरप्रकारामुळं संतप्त विद्यार्थी सुप्रीम कोर्टात
CBSE Result 2021 Date: सीबीएसई बारावीच्या विशेष परीक्षेच्या रिझल्टची तारीख जाहीर, निकाल कुठे पाहणार?
CBSE Class 10 compartment Exam result declared check at cbseresult nic in