AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावीच्या परीक्षा ऑनलाईन नको, 300 विद्यार्थ्यांची सरन्यायाधीशांकडे धाव, नेमकं प्रकरण काय?

ऑफलाईन पद्धतीनं आयोजित करण्याबाबत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन वी रमना (CJI NV Ramana) यांना 300 विद्यार्थ्यांनी पत्र लिहिलं आहे. CBSE Exam students wrote letter to CJI

बारावीच्या परीक्षा ऑनलाईन नको, 300 विद्यार्थ्यांची सरन्यायाधीशांकडे धाव, नेमकं प्रकरण काय?
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 10:37 AM

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) ची 12 परीक्षा रद्द करणे किंवा ऑफलाईन पद्धतीनं आयोजित करण्याबाबत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन वी रमना (CJI NV Ramana) यांना 300 विद्यार्थ्यांनी पत्र लिहिलं आहे. बारावीच्या निकालासंदर्भात एक वेगळी योजना जाहीर करण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी देखील केली आहे.(CBSE Exam 2021 class 12 th 300 students wrote letter to CJI NV Ramana opposing online exam demand for offline exam)

महामारीच्या काळात परीक्षा घेतल्यास तणाव

देशात कोरोना विषाणू संसर्ग आणि ब्लॅक फंगस या रोगाचा संसर्ग वाढत आहे. या कठिण परिस्थितीत ऑनलाईन परीक्षा आयोजित करु नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सध्याच्या परिस्थिती परीक्षा आयोजित करणे धोकादायक आहे. सध्या कोरोना संक्रमणामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणू संसर्गच्या परिस्थितीत तणाव असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री परीक्षेबाबत अंतिम निर्णय जाहीर करणार

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी 25 मेपर्यंत राज्य सरकारांनी त्यांचं मत कळवावं, असं म्हटलं आहे. रमेश पोखरियाल निशंक हे 30 मे आणि 1 जून रोजी बारावी परीक्षेसंदर्भात निर्णय जाहीर करु शकतात. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन परीक्षांचं आयोजन करणं व्यवहार्य नाही. यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालक यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता असल्याची भूमिका विद्यार्थ्यांकडून मांडण्यात येत आहे.

सीबीएसईचे देशभरात 14 लाख विद्यार्थी

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षांसाठी देशभरातून 14 लाख विद्यार्थी बसलेले आहेत. भारतातील सर्व परीक्षा बोर्डांची विद्यार्थ्यांची संख्या दीड कोटी आहे. महाराष्ट्रामध्ये राज्य परीक्षा मंडळाचे बारावीची विद्यार्थी संख्या 14 लाख असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.

सीबीएसईचं मत काय?

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मुख्य विषयांची परीक्षा घेऊ शकते. तर दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार सीबीएसई परीक्षेचा वेळ कमी करुन बहूपर्यायी स्वरुपात परीक्षेचं आयोजन करु शकते. यामुळे परीक्षेच्या पेपरचा वेळ देखील कमी होणार आहे. बहूपर्यायी म्हणजेत वस्तूनिष्ठ पद्धतींनं परीक्षा घेतल्यास परीक्षेचा वेळ तीन तासांवरुन दीड तासांवर येईल. सीबीएसईच्या मुख्य विषयांच्या यादीमध्ये एकूण 20 विषय आहेत. या विषयापैकी 4 विषय प्रत्येक विद्यार्थ्यानं निवडणं अपेक्षित असतं.

संबंधित बातम्या:

गुजरातचं ठरलं, बारावीच्या परीक्षा ‘या’ तारखेपासून, महाराष्ट्राचा निर्णय कधी होणार?

बोर्डाच्या परीक्षा घेता येत नसतील तर राजीनामा द्या, प्रकाश आंबेडकर यांचा राज्य सरकारवर निशाणा

CBSE Exam 2021 class 12 th 300 students wrote letter to CJI NV Ramana opposing online exam demand for offline exam

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.