CBSE Exam : समस्त ‘सीबीएसई’ बांधवांसाठी ‘खुशखबर’ ! सुधारित अभ्यासक्रम जारी करण्यात आलाय, या वेबसाईटवर आहे अभ्यासक्रम
पहिल्या टर्मच्या परीक्षा डिसेंबर मध्ये घेण्यात आल्या आणि आता दुसऱ्या टर्मच्या 26 एप्रिलपासून सुरु होणार आहेत. पण आता हेच दोन टर्म एक्झामचं नियोजन पुढील वर्षांपासून रद्द करून एकदाच परीक्षा घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय
नवी दिल्ली : सीबीएसईने (CBSE) 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2022-23 साठी सुधारित अभ्यासक्रम (Syllabus) जारी केलेला आहे. हा सुधारित अभ्यासक्रम cbseacademic.nic.in या वेबसाईटवर (Website) उपलब्ध आहे. बोर्डाने यापुढे सुद्धा अभ्यासक्रम वाढवण्यावर भर दिला जाणार नाही असं स्पष्ट केलंय. कोरोनामुळे जो 30 टक्के अभ्यासक्रम कपातीचा निर्णय घेण्यात आला होता तोच यापुढेही सुरु राहण्याची अपेक्षा आहे. मंडळाकडून 9वी, 10वी, 11वी आणि १२वी साठी समान अभ्यासक्रम जारी केला आहे.सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी ही खुशखबर आहे !
‘टू टर्म एक्झाम’ रद्द
कोरोनाच्या संकटामुळे सगळंच नियोजन विस्कळीत झालंय. या संकटाची शैक्षणिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर झळ बसलीये. या काळात शिक्षण क्षेत्रात नव्याने अनेक नियम बनवले गेले, परीक्षांसाठी नवीन नियोजनं केली गेली ती वारंवार मोडली गेली पुन्हा बनवली गेली. यातीलच एक नियोजन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचं 10वी 12वी साठीचं ‘टू टर्म एक्झाम’ नियोजन. कोरोना महामारीपूर्वी सीबीएसईने बोर्ड परीक्षांची दोन भागांमध्ये विभागणी केली होती. पहिल्या टर्मच्या परीक्षा डिसेंबर मध्ये घेण्यात आल्या आणि आता दुसऱ्या टर्मच्या 26 एप्रिलपासून सुरु होणार आहेत. पण आता हेच दोन टर्म एक्झामचं नियोजन पुढील वर्षांपासून रद्द करून एकदाच परीक्षा घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय.
निवेदनं शाळांकडून आल्यानंतर हा निर्णय
सीबीएसईने दोन टर्म परीक्षांचं स्वरूप कायम राहील असं कधीही जाहीर केलं नव्हतं असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर एकच परीक्षा पद्धत पुन्हा सुरु करण्याची निवेदनं शाळांकडून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं.
सीबीएसईची परीक्षा 26 एप्रिलपासून
सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा येत्या मंगळवारपासून म्हणजेच 26 एप्रिलपासून होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉलतिकीटाचे वाटपही करण्यात आलं आहे. दहावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरपर्यंत तर बारावीची परीक्षा जूनपर्यंत चालणार आहे.
इतर बातम्या :