CBSE Board Exam | सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी कशी करावी?
विद्यार्थ्यांनी योग्य नियोजनानं अभ्यास केल्यास चांगलं यश मिळू शकते. CBSE exam preparation
नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE ) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं असून प्रात्याक्षिक परीक्षांना सुरुवात झालीय. 4 मे ते 10 जून या काळात ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. कोरोनाचं संकट आणि अभ्यासक्रमातील कपात यामुळं विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांची तयारी करताना संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. मात्र, विद्यार्थ्यांनी योग्य नियोजनानं अभ्यास केल्यास चांगलं यश मिळू शकते. (CBSE exam how prepare for examination of class X and XII)
अभ्यासक्रम समजून घ्या
सीबीएसईच्या परीक्षा सुरु होण्यास अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परिक्षेच्या तयारीला सुरुवात केली नाही ते आतापासून तयारी करुन चांगलं यश मिळवू शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील बदलांना समजून घेणं आवश्यक आहे. अभ्यासक्रमाविषयी संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. सीबीएसईनं यावरिल चर्चा थांबवण्यासाठी शाळांना नवा अभ्यासक्रम पाठवून दिला आहे. विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अभ्यासक्रम समजून घेऊ शकतात.
सराव चाचण्यांचं महत्व
10 वी आणि बारावीच्या परीक्षा सुरु होण्यास अद्याप दोन महिन्यांचा कालावधी आहे. विद्यार्थ्यांनी यामुळं अभ्यासाकडं दुर्लक्ष करु नये. विद्यार्थ्यांनी घरी राहूनचं सराव परीक्षा, सराव परीक्षा देऊन कुठे कमी पडतोय, कुठे सुधारणेला वाव आहे, हे जाणून घेणं गरजेचे आहे.
गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास
विद्यार्थ्यांना साधारणपणे गणित, भौतिकशास्त्र, अकाऊंट यासारखे विषय अवघड जातात. त्यामुळे त्यांनी दररोज किमान 2 ते 3 तीन वेळ गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दिला पाहीजे. गतवर्षीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकाजमवून त्याप्रमाणं अभ्यासाला सुरुवात करणं आवश्यक आहे.
परीक्षा पद्धतीमधील बदल
सीबीएसई आणि इतर राज्य परीक्षा बोर्डांनी कोरोना संकटाचा विचार करुन परीक्षेचे स्वरुप बदललं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डानं अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केली आहे. जुन्या परीक्षा पद्धतीत बदल करुन गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रांच्या प्रश्नपत्रिकेत बहुपर्यायी प्रश्न विचारण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये उपयोजनात्मक प्रश्नांना प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी त्याअनुषंगानं परीक्षेची तयारी करण्याची गरज आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत शेतकऱ्यांना 50 हजारांपासून 1 लाखापर्यंत मदत, शासनाची तीन वर्षे आर्थिक मदतhttps://t.co/3qBwXQmsdH#farm | #Agricultre | #farmstories |
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 4, 2021
संबंधित बातम्या:
CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात,वाचा सविस्तर
(CBSE exam how prepare for examination of class X and XII)