CBSE Class 12 Exams : 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरदरम्यान बारावीच्या ऑप्शनल परीक्षा, CBSE ची सुप्रीम कोर्टात माहिती
'जे विद्यार्थी मुल्यांकन निकषांवर नाराज आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑप्शनल १२ वीच्या बोर्ड परीक्षा 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत होतील', असं सीबीएसई बोर्डाने सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे.
नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाने ठरववेल्या मुल्यांकन निकषावर काही विद्यार्थी नाराज होते. त्यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. त्यासाठी त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. आता सीबीएसईने कोर्टाला महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘जे विद्यार्थी मुल्यांकन निकषांवर नाराज आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑप्शनल १२ वीच्या बोर्ड परीक्षा 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत होतील’, असं सीबीएसई बोर्डाने सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रतिज्ञापत्रात बोर्डाने सांगितलं आहे की, बोर्डाट्या मूल्यांकन धोरणानुसार 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर केला जाईल. यानंतर सीबीएसई आपल्या निकालावर समाधानी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा पुरवेल.(CBSE optional 12th Board Exam 15 August to 15 September)
सीबीएसईने कोर्टात काय सांगितलं?
केवळ मुख्य विषयांचीच परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेत उमेदवाराने मिळविलेले गुण अंतिम मानले जातील. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल कसा असावा किंबहुना मूल्यांकन फॉर्म्युला काय असावा याचं धोरण सीबीएसईने निश्चित केले आहे. “एक सुनिश्चित धोरण निश्चित करण्यासाठी, प्रत्येक शाळेला विश्वासार्ह संदर्भांचा वापर करून शालेय पातळीवरील भिन्नता लक्षात घेऊन आंतरिकरित्या गुणांचे मॉडरेशन करावं लागेल,” असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
मूल्यांकन योजनांमध्ये बदल केले आहेत
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आणि काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट या दोघांनाही सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, 12 वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना आम्ही अधिक संशोधन करुन त्यांच्या संबंधित मूल्यांकन योजनांमध्ये बदल केले आहेत…
(CBSE optional 12th Board Exam 15 August to 15 September)
हे ही वाचा :
Career After 12th in Commerce : वाणिज्य शाखेतून 12 वी केलीय? आपल्या करिअरसाठी 5 बेस्ट ऑप्शन…
तरुण म्हणून तुम्ही योग्य मार्गावर आहात का? भारतातील ‘या’ पहिल्या अनोख्या प्रश्नावलीतून जाणून घ्या
HSC Result: बारावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी, निकालाचा फॉर्म्युला फायनल? पुण्यात बैठकीचं आयोजन