CBSE Pass Percentage 2023 Class 12: CBSE 12 वी चा निकाल! विद्येच्या माहेरघराचा किती टक्के निकाल लागला माहितेय का?
CBSE 12th Result 2023: पुणे तिथे काय उणे? आज CBSE चा बारावीचा निकाल लागलाय. किती टक्के निकाल लागला असावा पुण्याचा? पुणे आणि शिक्षणात मागे राहील असं होईल काय? पुणे विभागातील विद्यार्थ्यांनी चांगलाच धूर केलाय असं म्हणायला हरकत नाही. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळालंय.
पुणे: पुणे तिथे काय उणे? आज CBSE चा बारावीचा निकाल लागलाय. किती टक्के निकाल लागला असावा पुण्याचा? पुणे आणि शिक्षणात मागे राहील असं होईल काय? सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेचा पुण्याचा तब्बल 87.28 टक्के निकाल लागलेला आहे. पुणे विभागातील विद्यार्थ्यांनी चांगलाच धूर केलाय असं म्हणायला हरकत नाही. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळालंय. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आज बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल 2023 या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षेला यंदा 16.9 लाख विद्यार्थी बसले होते. यामध्ये 7.4 लाख मुली, 9.51 लाख मुलं आणि 5 ‘इतर’ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. 36दिवसांत एकूण 115 विषयांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती आणि निकाल आता सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
CBSE बोर्डाचा निकाल कुठे पाहायचा?
CBSE रिजल्ट 2023: स्कोर चेक करण्यासाठी
- results.cbse.nic.in वर जा.
- बारावीच्या निकालाच्या पेजवर जा.
- विचारलेली माहिती टाकून लॉगिन करा.
- आपला CBSE निकाल तपासा आणि डाउनलोड करा.
रिझल्ट चेक करण्यासाठी तुम्ही
- अधिकृत वेबसाइट cbse.gov.in विद्यार्थी त्यांचे सीबीएसई बोर्डाचे निकाल अनेक प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
- विद्यार्थी CBSE दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका अधिकृत वेबसाइट्स, परीक्षा संगम, उमंग ॲप, डिजिलॉकर ॲप, SMS आणि IVRS प्रणालीद्वारे तपासू शकतात.
- विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेकडून त्यांच्या मूळ गुणपत्रिका मिळतील. Digilocker ने CBSE बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी लिंक ॲक्टिव्हेट केली आहे.
- विद्यार्थी अधिकृत वेबसाइट – cbseservices.digilocker.gov.in भेट देऊन निकाल पाहू शकतात
पिन नंबरशिवाय निकाल तपासता येणार नाही
बोर्डाने बुधवारी नोटीस जारी करत दहावी आणि बारावी परीक्षा 2023 चा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, असे म्हटले. बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी निकाल जाहीर झाल्यानंतर डिजीकेबलवर गुणपत्रिका डाऊनलोड करू शकतात. त्यासाठी मंडळाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला 6 अंकी पिन क्रमांक पाठविण्यात येणार आहे. पिन क्रमांक शाळांना पाठविला जाईल, जो शाळा विद्यार्थ्यांना देतील. सुरक्षेचा विचार करून मंडळाने गेल्या वर्षीपासून ही यंत्रणा सुरू केली आहे.