CBSE Date Sheet | सीबीएसई बोर्डाच्या दहावी बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, कोणता पेपर कधी?
केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्डानं दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकातील बदल जाहीर केला आहे. CBSE released revised date sheet o
नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड(CBSE) नं दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकातील बदल जाहीर केला आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचं बदलेलं वेळापत्रक पाहण्यासाठी सीबीएसईच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांनी cbse.gov.in वर भेट द्यावी आणि वेळापत्रकातील बदल समजून घ्यावेत. (CBSE released revised date sheet of 10 and 12th class exam check here new schedule)
दहावीच्या वेळापत्रकातील बदल
सीबीएसईच्या दहावीचा 15 मे रोजी होणारा विज्ञान विषयाचा पेपर आता 21 मे रोजी होईल. 21 मे रोजी होणारा गणित विषयाचा पेपर 2 जूनला होईल. दोन्ही पेपर सकाळी 10.30 ते 1.30 या दरम्यान होतील. पेपरचा कालावधी 10.30 ते 1.30 हा असला तरी विद्यार्थ्यांनी 10.00 वाजता परीक्षा कक्षात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आलं आहे.
बारावीच्या वेळापत्रकातील बदल
बारावी विज्ञान या वर्गाच्या वेळापत्रकामध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. भौतिकशास्त्राचा13 मे रोजी होणारा पेपर आता 8 जून रोजी होईल. तर, गणित आणि उपयोजित गणित विषयाचा पेपर 31 मे रोजी घेतला जाईल. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी सीबीएसईच्या वेबसाईटला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलेय.
बारावी वाणिज्या शाखेच्या गणित आणि उपयोजित गणित या विषयाची परीक्षा आता 31 मे रोजी होईल. तर बारावी आर्टस शाखेच्या भूगोल विषयाचा 2 जून रोजी होणारा पेपर आता 3 जून रोजी होणार आहे. सध्या सीबीएसईकडून प्रात्याक्षिक परीक्षा घेणे सुरु आहे.
प्रात्याक्षिक परीक्षेपूर्वी आणि नंतर सॅनिटायझेशन
सीबीएसईने दिलेल्या निर्देशानुसार प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यापूर्वी आणि नंतर प्रयोगशाळा सॅनिटाईझ केले जाईल.प्रात्याक्षिक परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना हँड सॅनिटायझर पुरवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना मास्क शिवाय प्रयोगशाळेत प्रवेश दिला जाणार नाही.
सीबीएसईचं परीक्षेचे वेळापत्रक कसं पाहाल?
1. सर्वात आधी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट www.cbse.nic.in आणि www.cbse.gov.in ला भेट द्या. 2. ‘Latest@CBSE’ लिंकवर क्लिक करुन आपला वर्ग निवडा. 3. यानंतर तुमच्या वर्गाप्रमाणे इयत्ता दहावी किंवा बारावीचं वेळापत्रक दिसेल. 4. या ठिकाणी तुम्ही वेळापत्रक डाऊनलोड करु शकता किंवा सेव्ह करुन प्रिंट करु शकता.
CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात,वाचा सविस्तरhttps://t.co/DSaYD3IhRl#cbse | #cbseexam | #cbse2021 | #cbsepracticalexam
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 2, 2021
संबंधित बातम्या
CBSE Board Exam 2021: सीबीएसई बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात,वाचा सविस्तर
CBSE Exam class 10: सामाजिक विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमाविषयी अफवा, सीबीएसईकडून स्पष्टीकरण
(CBSE released revised date sheet of 10 and 12th class exam check here new schedule)