सीबीएसईने 2021-22 टर्म 1 बोर्ड परीक्षेसाठी नमुना पेपर जारी, 10 वी, 12 वीचे विद्यार्थ्यांनी असे करा डाउनलोड
10 वी आणि 12 वी नमुना पेपर अधिकृत वेबसाईट cbseacademic.nic.in वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थी या संकेतस्थळावरूनच नमुना पेपर डाउनलोड करू शकतात. नमुना पेपरमधून विद्यार्थ्यांना कल्पना येईल की कोणत्या प्रकारचा पेपर येईल आणि त्यात प्रश्न कसे असतील.
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी टर्म 1 बोर्ड परीक्षा 2022 चे नमुना पेपर जारी केले आहेत. एका मोठ्या बदलामध्ये, सीबीएसईने पुढील वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. 10 वी आणि 12 वी नमुना पेपर अधिकृत वेबसाईट cbseacademic.nic.in वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थी या संकेतस्थळावरूनच नमुना पेपर डाउनलोड करू शकतात. नमुना पेपरमधून विद्यार्थ्यांना कल्पना येईल की कोणत्या प्रकारचा पेपर येईल आणि त्यात प्रश्न कसे असतील. (CBSE Releases Sample Paper for 2021-22 Term 1 Board Examination, 10th, 12th Students Do It Download)
सीबीएसई नमुना पेपर कसा डाऊनलोड करावा
विद्यार्थी सीबीएसईच्या थेट लिंकवर क्लिक करून नमुना पेपर सहज डाउनलोड करू शकतात.
10 वी आणि 12 वी चा निकाल कसा लागेल हे जाणून घ्या.
1. जर महामारीची परिस्थिती सुधारली आणि विद्यार्थी शाळेत किंवा परीक्षा केंद्रावर जाण्यास सक्षम झाले तर?
उत्तर : बोर्ड शाळा/केंद्रांवर टर्म I आणि टर्म II परीक्षा आयोजित करेल आणि थेअरी गुण दोन्ही परीक्षांमध्ये समान प्रमाणात वितरीत केले जातील.
2. जर कोविड महामारीमुळे नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये शाळा बंद असतील, तर टर्म -2 परीक्षा शाळा किंवा केंद्रांवर घेतल्या तर?
उत्तर : विद्यार्थी टर्म-1 परीक्षा (MCQ आधारित) ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोडमध्ये घरूनच देतील. अंतिम निकालात या परीक्षेच्या गुणांचे वेटेज कमी केले जाईल आणि टर्म -2 परीक्षेचे वेटेज वाढेल.
3. जर कोरोनामुळे मार्च-एप्रिल 2022 मध्ये शाळा बंद झाल्या, तर टर्म-1 परीक्षा शाळा किंवा केंद्रांवर घेतल्या जातात का?
उत्तर : अंतिम निकाल टर्म -1 मधील विद्यार्थ्यांच्या कामगिरी आणि अंतर्गत मूल्यांकनांच्या आधारे तयार केला जाईल. टर्म-1 परीक्षेचे वेटेज वाढवले जाईल.
4. जर कोरोनामुळे शाळा पूर्णपणे बंद करावी लागली आणि विद्यार्थ्यांना टर्म-1 आणि 2 दोन्ही परीक्षा घरीच द्याव्या लागल्या तर?
उत्तर : या प्रकरणात अंतिम निकाल अंतर्गत मूल्यमापन, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट वर्क आणि टर्म-1 आणि टर्म-2 सिद्धांत परीक्षांच्या आधारे तयार केला जाईल (जे विद्यार्थी घरून देतील). तथापि, घरातून दिलेल्या परीक्षांचे वेटेज त्या परीक्षांच्या पडताळणीयोग्य, विश्वसनीयता आणि वैधतेवर अवलंबून असेल. (CBSE Releases Sample Paper for 2021-22 Term 1 Board Examination, 10th, 12th Students Do It Download)
काबूलमध्ये लागले ‘तालिबान सरकार’ स्थापनेसाठी होर्डिंग्ज, हक्कानी नेटवर्कलाही सत्तेत मिळेल स्थान, मुल्ला बरदार करतील नेतृत्वhttps://t.co/aU2ktg5w9B#Kabul |#TalibanGovernment |#HaqqaniNetwork |#Power
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 3, 2021
इतर बातम्या