CBSE : गुजरातमध्ये कोणत्या सरकारच्या काळात 2002 मध्ये मुस्लीम विरोधी हिंसा झाली? वादग्रस्त प्रश्नावर सीबीएसईचा माफिनामा

केंद्रीय माध्यमिक विद्यालयाची (CBSE) बारावीच्या पहिल्या टर्मची (Class 12 term 1 exam) परीक्षा 1 डिसेंबरपासून सुरु झाली.

CBSE : गुजरातमध्ये कोणत्या सरकारच्या काळात 2002 मध्ये मुस्लीम विरोधी हिंसा झाली? वादग्रस्त प्रश्नावर सीबीएसईचा माफिनामा
सीबीएसई बोर्ड
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 1:55 PM

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक विद्यालयाची (CBSE) बारावीच्या पहिल्या टर्मची (Class 12 term 1 exam) परीक्षा 1 डिसेंबरपासून सुरु झाली. पहिल्या दिवशीच्या समाजशास्त्राच्या (Sociology) परीक्षेत विचारलेल्या प्रश्नावरुन वादंग निर्माण झाला आहे. “2002 साली गुजरातमध्ये मुस्लिमांविरुद्ध प्रचंड हिंसाचार झाला त्यावेळी कोणाचं सरकार होतं?”, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला काँग्रेस, भाजप, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन असे पर्याय देण्यात आले होते. समाजशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतील 23 व्या प्रश्नावरुन सीबीएसईनं माफी मागितली आहे.

वादंग झाल्यानंतर सीबीएसईकडून माफी, कारवाईचे संकेत

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळानं(CBSE) ने इयत्ता 12 वीच्या टर्म-1 बोर्ड परीक्षेतील समाजशास्त्राच्या पेपरमध्ये विचारलेल्या प्रश्नाबद्दल माफी मागितली आहे. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असं म्हटलं आहे. सीबीएसईनं समाजशास्त्राचा पेपर झाल्यानंतर काही तासातच हा प्रश्न विचारल्याबद्दल माफी मागितली. सीबीएसईनं हा प्रश्न आमच्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन केल्याचं म्हटलंय. आम्ही या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे. संबंधित प्रश्नामुळं सीबीएसईनं प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी तयार करणाऱ्या बहिस्थ विषय तज्ज्ञांसाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन झाल्याचं म्हटलं आहे. सीबीएसईनं ही चूक मान्य केली असून संबंधित व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात येईल, असं म्हटलंय.

गुजरातमध्ये 2002 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत

गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. त्यावेळी गुजरातचं मुख्यमंत्रिपद नरेंद्र मोदी यांच्याकडे होते. 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसचा एस 6 डबा पेटवण्यात आला होता. आयोध्येला जाणारे कारसेवक रेल्वेच्या या डब्यात होते. या जाळपोळीत 59 लोकांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर गुजरातमध्ये अनेक ठिकाणी दंगली सुरू झाल्या आणि या दंगलींमध्ये 1000 हून अधिक लोक मारले गेले.

इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार सीबीएसई परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी विषय तज्ज्ञांचे दोन पॅनेल असतात. पेपर सेटर्स आणि मॉडरेटर असतात. परीक्षेचे पेपर तयार करणाऱ्या तज्ञांची ओळख गोपनीय ठेवली जाते. पेपर सेटर्सनाही हे माहीत नसते की त्यांनी निवडलेला प्रश्न प्रश्नपत्रिकेत वापरला जाईल की नाही. अखेर सीबीएसईने माफी मागत या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

इतर बातम्या:

Ratnagiri | अवकाळी पावसाचा आंबा पिकाला मोठा फटका, मोहर गेले गळून

Sanjay Raut | व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोड शो, त्याला आम्ही लूट म्हणतो : संजय राऊत

CBSE said Question in class 12 exam paper under which government anti Muslim violence took place in Gujrat is error and board will take action

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....