CBSE Syllabus: सीबीएसई पाठ्यपुस्तकातून “फैज अहमद फैज बॉयकॉट” ! नवीन अभ्यासक्रमातील ही बाब तुमच्या लक्षात आलीये का ?
काही दिवसापूर्वी सीबीएसईने ती योजना रद्द करून पुन्हा एक टर्म योजना आणली ज्यात बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आता फक्त एकदाच परीक्षा द्यावी लागणार आहे. ही घोषणा केल्यानंतर सीबीएसईने अभ्यासक्रम देखील घोषित केला होता. हा अभ्यासक्रम त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
नवी दिल्ली : कोरोना (Corona)आटोक्यात आल्यानंतर शाळा कॉलेजेस नियमित सुरु झाले. शाळा सुद्धा कोरोना काळात तयार केलेल्या नियमांमध्ये (Rules) दुरुस्ती करू लागली. कोरोना काळात सीबीएसईने (CBSE) दोन टर्मची योजना आणली. काही दिवसापूर्वी सीबीएसईने ती योजना रद्द करून पुन्हा एक टर्म योजना आणली ज्यात बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आता फक्त एकदाच परीक्षा द्यावी लागणार आहे. ही घोषणा केल्यानंतर सीबीएसईने अभ्यासक्रम देखील घोषित केला होता. हा अभ्यासक्रम त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. या २०२२-२३ च्या नवीन घोषित केलेल्या ११वी १२वी च्या अभ्यासक्रमातून सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने इतिहास आणि राज्यशास्त्र विषयांतील काही धडे वगळले आहेत. अलिप्ततावादी चळवळ, औद्योगिक क्रांती, शीतयुद्धाचा काळ, मुघल राजवटीचा इतिहास, आफ्रिका आशिया खंडामध्ये इस्लामी राजवटीचा उदय या विषयांवरील धडे याचबरोबर उर्दू कवी फैज अहमद फैज यांच्या दोन अनुवादित कविता या गोष्टी वगळल्या आहेत.
काय काय वगळलं आहे अभ्यासक्रमातून
धडे
- शीतयुद्धाचा काळ
- औद्योगिक क्रांती
- अलिप्ततावादी चळवळ
- मुघल राजवटीचा इतिहास
- आफ्रिका आशिया खंडामध्ये इस्लामी राजवटीचा उदय
- लोकशाही आणि विविधता विषयांवरील धडे
- इयत्ता 10वी – अन्न सुरक्षा या विषयावरील धडा – जागतिकीकरणाचा शेतीवर परिणाम हा भाग वगळला.
उर्दू कवी फैज अहमद फैज
‘धर्म, जातीयवाद, राजकारण – जातीयवाद, सेक्युलर राष्ट्र’ या विभागातून उर्दू कवी फैज अहमद फैज यांच्या दोन अनुवादित कविता
सुधारित अभ्यासक्रम या वेबसाईटवर उपलब्ध
दरम्यान सीबीएसईचा हा सुधारित अभ्यासक्रम cbseacademic.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. बोर्डाने 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2022-23 साठी सुधारित अभ्यासक्रम जारी केलेला आहे. बोर्डाने यापुढे सुद्धा अभ्यासक्रम वाढवण्यावर भर दिला जाणार नाही असं स्पष्ट केलंय. कोरोनामुळे जो 30 टक्के अभ्यासक्रम कपातीचा निर्णय घेण्यात आला होता तोच यापुढेही सुरु राहण्याची अपेक्षा आहे.
इतर बातम्या :