Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE Admit Card 2021: सीबीएसईकडून दहावी बारावीच्या पहिल्या टर्म परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या प्रथम सत्र परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केली गेली आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सीबीएसईच्या cbse.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध होतील.

CBSE Admit Card 2021: सीबीएसईकडून दहावी बारावीच्या पहिल्या टर्म परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?
सीबीएसई
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 4:44 PM

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या प्रथम सत्र परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केली गेली आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सीबीएसईच्या cbse.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध होतील. नवीन शिक्षण धोरणानुसार यंदा प्रथमचं सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन सत्रात घेण्यात येत आहेत.

प्रवेशपत्र डाऊनलोड कसे करावे?

स्टेप 1 : प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. स्टेप 2 : वेबसाईटच्या होम पेजवरील, 10वी, 12वी परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करा या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: नोंदणी क्रमांक/रोल क्रमांक/जन्मतारीख सबमिट करा स्टेप 4 : आता हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल. स्टेप 5 : हॉल तिकीट डाऊनलोड करा आणि प्रिंट आऊट काढा.

प्रवेशपत्र कुठं मिळणार?

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचं प्रवेशपत्र उलपब्ध होईल. तर, खासगी विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध होईल.

विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर देखील जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावर रोल नंबर, परीक्षा केंद्र, परीक्षेची वेळ, परीक्षेसंदर्भातील सर्व सूचना उपलब्ध होणार आहेत.

सीबीएसई मायनर परीक्षेला 16 नोव्हेंबरपासून सुरुवात

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सीबीएसईनं दहावी बारावीच्या परीक्षा दोन सत्रात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सीबीएसईकडून दहावी बारावीच्या टर्म 1 च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. इयत्ता 10 वीची टर्म I मायनर विषय परीक्षा 17 नोव्हेंबर रोजी पेंटिंग पेपरसह सुरू होईल आणि इयत्ता 12 वी टर्म 1 ची मायनर विषयांची परीक्षा 16 नोव्हेंबर सुरु होईल. दहावीची मेजर परीक्षा 30 नोव्हेंबर तर बारावीची मेजर विषयांची परीक्षा 1 डिसेंबर रोजी सुरु होणार आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी

सीबीएसईने विद्यार्थ्यांना नोटीसद्वारे परीक्षा केंद्र बदलण्याची परवानगी देण्यात आल्याचं सांगितलं आहे. बोर्डाच्या निदर्शनास आल्यानुसार अनेक विद्यार्थी त्यांची शाळा आहे त्या ठिकाणी नाहीत, अशा स्थितीत परीक्षेचे शहर बदलण्याची सुविधा विद्यार्थ्यांना दिली जाईल. सीबीएसईनं विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेशी कधी संपर्क साधू शकतात आणि परीक्षा केंद्र बदलण्याची विनंती करू शकतात यांसदर्भात सविस्तर माहिती देणार आहे.

इतर बातम्या:

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ट्विस्ट, भाजपची माघार महाविकास आघाडीपुढं नव्या पॅनेलचं आव्हान

कथित वसुली प्रकरणात नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके यांना 7 दिवसांची सीआयडी कोठडी

CBSE Term 1 Admit card 2021 released at cbse gov in of Class 10 and Class 12 check details here

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.