CBSE Date Sheet 2021 : सीबीएसई दहावी बारावीच्या पहिल्या सत्राची डेटशीट जाहीर करणार, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसई दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षांच्या तारखा आज जाहीर करण्याची शक्यता आहे. सीबीएसईनं 14 ऑक्टोबरला एक परिपत्रक जाहीर करुन यासंदर्भात माहिती दिली होती.

CBSE Date Sheet 2021 : सीबीएसई दहावी बारावीच्या पहिल्या सत्राची डेटशीट जाहीर करणार, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता
CBSE
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 12:31 PM

CBSE Date Sheet 2021 नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसई दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षांच्या तारखा आज जाहीर करण्याची शक्यता आहे. सीबीएसईनं 14 ऑक्टोबरला एक परिपत्रक जाहीर करुन यासंदर्भात माहिती दिली होती. सीबीएसईकडून 18 ऑक्टोबर म्हणजे आजचं नोव्हेंबर आणि डिसेंबर 2021 च्या सत्र परीक्षांसाठी वेळापत्रक जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थी डेटशीट अधिकृत वेबसाईट cbse.nic. in या वेबसाईटवरुन डाऊनलोड करु शकतात.

सीबीएसई दहावी बारावी पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबरमध्ये सुरु?

सीबीएसईनं दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबरमध्ये सुरु करण्याची शक्यता आहे आहे. सीबीएसईकडून यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन सत्रात घेण्याच निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या सत्राची परिक्षा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळतेय. आहे. तर, सत्र दोनची परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे.

परीक्षा सकाळी 11.30 वाजता सुरु

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील थंडीचा विचार करता सीबीएसईकडून परिक्षा सुरु करण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नेहमी परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरु होत असते. मात्र, थंडीचा विचार करता ही परीक्षा सकाळी 11.30 वाजता सुरु होईल. तर, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं वाचन करण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.

ऑफलाईन परीक्षा

सीबीएसई बोर्डाने म्हटले आहे की, सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षा केवळ ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. बोर्डाने टर्म -1 परीक्षेत 50 टक्के अभ्यासक्रमावर आधारित पेपर तयार केले जातील, असं सांगितलं आहे.

डेट शीट कशी पाहावी

स्टेप 1: सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट- cbse.nic.in ला भेट द्या . स्टेप 2: त्यात Whats New याच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: 10 वी किंवा 12 वीच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 4: आता एक पीडीएफ उघडेल, ते डाऊनलोड करा.

इतर बातम्या:

CBSE 10th Compartment Results 2021: सीबीएसई दहावीच्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर, रिझल्ट कुठं पाहायचा?

CBSE Result 2021: सीबीएसई बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर, रिझल्ट कुठं पाहायचा?

CBSE Term 1 Date Sheet 2021 Live Update Time table for Class 10th and 12th Exam Know how to check on cbsegov in for download date sheet

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.