CBSE Class 10 Answer Key 2021 : सीबीएसई दहावीच्या सामाजिक शास्त्र विषयाची उत्तरतालिका कुठं पाहणार? डाऊनलोड कशी करणार?

सीबीएसईच्या दहावीच्या मुख्य विषयांची पहिल्या सत्राची परिक्षा आजपासून सुरु झाली आहे. सामाजिक शास्त्राच्या पेपरसह आजपासून इयत्ता दहावीची पहिल्या सत्राची परीक्षा सुरु झाली.

CBSE Class 10 Answer Key 2021 :  सीबीएसई दहावीच्या सामाजिक शास्त्र विषयाची उत्तरतालिका कुठं पाहणार? डाऊनलोड कशी करणार?
सीबीएसई
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 2:59 PM

CBSE Term 1 exam नवी दिल्ली : सीबीएसईच्या (CBSE Term 1 exam) दहावीच्या मुख्य विषयांची पहिल्या सत्राची परिक्षा आजपासून सुरु झाली आहे. सामाजिक शास्त्राच्या (Social Science) पेपरसह आजपासून इयत्ता दहावीची पहिल्या सत्राची परीक्षा सुरु झाली. विद्यार्थ्यांना दहावीच्या सामाजिक शास्त्र विषयाची (Social Science Answer Key) उत्तरतालिका www.cbse.gov.in या अधिकृत वेसबाईटवर जाऊन डाऊनलोड करता येईल. सीबीएसईनं आतापर्यंत अधिकृत उत्तरतालिका जाहीर केलेली नाही. मात्र, लवकरचं सीबीएसईकडून सामाजिक शास्त्र विषयाची उत्तरतालिका जाहीर केली जाऊ शकते.

सामाजिक शास्त्र विषयाची उत्तरतालिका कशी डाऊनलोड करायची?

स्टेप 1: सीबीएसईच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या

स्टेप 2 : होमपेजवरील प्रश्नपत्रिका टॅबवर क्लिक करा

स्टेप 3 : पेजवर सीबीएसई दहावी सोशल सायन्स प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका सर्च करा

स्टेप 4 : सीबीएसई दहावी सोशल सायन्स प्रश्नपत्रिका पीडीएफ उपलब्ध होईल

स्टेप 5 : सोशल सायन्स विषयाची उत्तरतालिका डाऊनलोड करा आणि प्रिट आऊट घ्या.

नव्या शिक्षण धोरणानुसार दोन सत्रात परीक्षा

नरेंद्र मोदी सरकारनं नवीन शिक्षण धोरण लागू केलं आहे. नव्या शिक्षण धोरणानुसार सीबीएसईनं दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन सत्राक आयोजित करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रात विद्याथ्यांना बहूपर्यायी प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. तर, दुसऱ्या सत्रातील परीक्षेत दिर्घोत्तरी प्रश्न विचारले जातील.

परीक्षा सकाळी 11.30 वाजता सुरु

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील थंडीचा विचार करता सीबीएसईकडून परीक्षा सुरु करण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नेहमी परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरु होत असते. मात्र, थंडीचा विचार करता ही परीक्षा सकाळी 11.30 वाजता सुरु होईल. तर, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं वाचन करण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.

प्रश्न कसे असणार?

सीबीएसईतर्फे घेण्यात येणारी टर्म वन म्हणजेज पहिल्या सत्राची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात असेल. विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत. कोरोना संसर्गाची स्थिती कमी झाल्यास यंदाच्या दोन्ही सत्राच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीन घेतल्या जाणार आहेत.

या विषयांची होणार परीक्षा

सामाजिक शास्त्र, विज्ञान, गृह विज्ञान, स्टँडर्ड गणित, बेसिक गणित, कॉम्प्युटर अ‌ॅप्लिकेशन्स, हिंदी कोर्स अ, हिंदी कोर्स ब, इंग्रजी या विषयांची परीक्षा घेण्यात येणार आहे. 11 डिसेंबरला दहावीच्या परीक्षेचा अंतिम पेपर असेल.

इतर बातम्या:

Pune School Reopening Date : पुण्यात शाळांची घंटा 15 डिसेंबरला वाजणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

CBSE Term 1 exam : सीबीएसई दहावीच्या पहिल्या सत्राची परीक्षा आजपासून, नेमकं स्वरुप काय?

CBSE term 1 exam class 10 social science 2021 22 answer key pdf download

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.