आता जिल्हा परिषदेच्या शाळांवर CCTV ची नजर, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

येत्या वर्षभरात राज्यातील सर्वच शासकीय शाळांमध्ये सीटीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावण्याची मोठी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केली आहे. राज्यातील शासकीय शाळेच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय शाळेत वर्षभरात टप्प्या टप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

आता जिल्हा परिषदेच्या शाळांवर CCTV ची नजर, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा
वर्षा गायकवाडImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 1:23 PM

मुंबई : येत्या वर्षभरात राज्यातील सर्वच शासकीय शाळांमध्ये सीटीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावण्याची मोठी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केली आहे. राज्यातील शासकीय शाळेच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय शाळेत वर्षभरात टप्प्या टप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. ज्या शाळेत विद्यार्थ्यांची (Students) संख्या जास्त आहे. आशा शाळांमध्ये प्रथम सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. राज्यात एकूण 65 हजार जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. नुसतेच सीसीटीव्ही कॅमेरे लावून देखील चालणार नाही तर त्याची व्यवस्थित देखभाल होण्याची गरज असल्याचे देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

राज्य सरकारचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य आहे. राज्यात सध्या स्थितीमध्ये एकूण  65 हजार जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या तसेच राज्यातील प्रत्येक शाळांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. येत्या वर्षाभरात शाळांचा प्राधान्य क्रम ठरवून हे काम पूर्ण केले जाईल. तसेस सर्व खासगी शाळांना देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात येतील असे देखील त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

सुरक्षेमध्ये वाढ

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.  प्रत्येक शाळेमध्ये सीटीव्ही कॅमेरा बसवल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ होणार आहे. तसेच गैर प्रकारांना आळा बसेल. येत्या वर्षभरात राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या

ऑनलाईन गेमसंदर्भातील कायद्यामध्ये बदल करण्यात यावेत; नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची मागणी

Pratap Sarnaik property attached: सर्वात मोठी बातमी! प्रताप सरनाईक यांची सव्वा अकरा कोटीची संपत्ती जप्त, शिवसेनेला ईडीचा दुसरा दणका

Nandurbar Accident | कंटेनर-आर्टिका गाडीचा भीषण अपघात, तीन जण ठार, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.