शिक्षकांसाठी मोठी बातमी, टीईटी प्रमाणपत्राची वैधता आयुष्यभर राहणार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी शिक्षकांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. TET certificate validity period

शिक्षकांसाठी मोठी बातमी, टीईटी प्रमाणपत्राची वैधता आयुष्यभर राहणार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय
रमेश पोखरियाल निशंक
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 3:10 PM

TET Certificate नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी शिक्षकांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट प्रमाणपत्राची वैधता 7 वर्षांहून वाढवत त्या शिक्षकाच्या आयुष्यभरासाठी वैध ठरवली आहे. पोखरियाल यांनी शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमदेवारांसाठी आणि सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी महत्वाचा निर्णय असल्याचं म्हटलं आहे. (Central Education Ministry decided to extend TET certificate validity period)

शिक्षक पात्रता परीक्षा 2011 पासून अनिवार्य

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं 2011 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेच्या प्रमाणपत्राची वैधता 7 वर्ष ठरवण्यात आली होती.

नव्यानं टीईटी प्रमाणपत्र देण्यात येणार

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियान निशंक यांनी केंद्रशासित प्रदेश आणि राज्य सरकार ज्यांच्या टीईटी प्रमाणपत्रांची सात वर्षांची मुदत संपली आहे ती नव्यानं जारी करतील, असं सांगितलं. 2011 नंतर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं शिक्षक व्हायचं असेल तर आवश्यक करण्यात आलं होतं.

शिक्षक आणि उमेदवारांना मोठा दिलासा

शासकीय शाळांमधील शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना आणि ज्या शिक्षकांनी यापूर्वी टीईटीचं प्रमाणपत्र मिळवलं असेल पण मुदत संपली असेल त्यांना केंद्र सरकारच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. 2011 नंतर टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची प्रमाणपत्र आयुष्यभर वैध असतील. केंद्रीय शिक्षणमंत्री हा निर्णय शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना दिलासा देणारा असल्याचं म्हणाले.

बारावीचा निकाल कसा लावणार, सुप्रीम कोर्टाची विचारणा

 सुप्रीम कोर्टात बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंबंधी अ‌ॅड. ममता शर्मा यांच्या याचिकेवर पार पडली. सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान केंद्र सरकारला दोन आठवड्यामध्ये बारावीचा निकाल कसा लावणार हे सांगा, असा अल्टिमेटम दिला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी देशातील आणि परदेशातील अभ्यासक्रमांचे प्रवेश महच्वाचे आहेत. तुम्ही तातडीनं निर्णय घ्या, गरज पडल्यास दररोज ऑनलाईन मिटिंग घ्या पण दोन आठवड्यामध्ये निर्णय जाहीर करा, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे.

संबंधित बातम्या:

दहावीची परीक्षा घेण्यासाठी हट्ट का?, धनंजय कुलकर्णींना कोर्टाची विचारणा, याचिका मागे घेतल्याने निकाली

बारावीच्या निकालासाठी दररोज आनलाईन मिटींग घ्या, 2 आठवड्यामध्ये निकष सांगा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

(Central Education Ministry decided to extend TET certificate validity period)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.