CISCE Result 2022 : आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या प्रथम सत्र परीक्षेचा निकाल जाहीर, एसएमएसद्वारेही पाहा रिझल्ट
काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) 10 वी आणि 12 वीच्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर झाला आहे. (ICSE, ISC Result 2022) दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
नवी दिल्ली: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) 10 वी आणि 12 वीच्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर झाला आहे. (ICSE, ISC Result 2022) दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.आयसीएसईचा निकाल (CISCE Result 2022) परिषदेच्या संकेतस्थळावर आणि एसएमएसद्वारे उपलब्ध करुन दिला जाईल. cisce.org आणि results.cisce.org या आयसीएसईच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होणार आहे. तर, एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.विद्यार्थी त्यांचा दहावीचा आणि बारावीचा निकाल एसएमएसद्वारे मिळवू शकतात. एसएमएसद्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी ICSE/ISC(Unique ID) लिहून 09248082883 या क्रमांकावर पाठवल्यास विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल उपलब्ध होऊ शकेल. आयसीएसई आणि आयएससी परीक्षेचा निकाल cisce.org आणि results.cisce.org या आयसीएसईच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या टर्मची परीक्षा कधी होणार याबद्दल तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.
निकाल कसा पाहायचा?
स्टेप 1: विद्यार्थ्यांनी प्रथम अधिकृत वेबसाइट cisce.org ला भेट द्यावी. स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: रोल नंबर किंवा इतर सबमिट करा. स्टेप 4 : यानंतर निकाल स्क्रीनवर दिसून येईल. स्टेप 5 : निकालाची प्रत सेव्ह करुन ठेवा किंवा प्रिंट आऊट घ्या
नव्या शिक्षण धोरणानुसार सत्र परीक्षा
केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार सीबीएसई आणि आयसीएसईकडून दहावी आणि बारावीच्या सत्र परीक्षा घेण्यात येत आहेत. आयसीएसईच्या परीक्षा 29 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर तर आयएससीची परीक्षा 22 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरला झाली होती. सीआयएससीईकडून उत्तर पत्रिकांच्या रीचेकिंगसाठी अर्ज करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सुविधा 10 फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध असेल.
दुसऱ्या टर्मची परीक्षा कधी?
आयसीएसई आणि आयसीएस परीक्षेच्या दुसऱ्या टर्मच्या परीक्षांबद्दल सीआयएससीईकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. येत्या काही दिवसांमध्ये दुसऱ्या सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सीबीएसईकडून देखील दहावी बारावीच्या सत्र परीक्षा घेण्यात आल्या. अद्याप त्यांच्याकडून दहावी बारावीचा प्रथम सत्राचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही.
इतर बातम्या:
विराटचं मन थाऱ्यावर नाही, WI विरुद्धच्या 4 चेंडूंच्या खेळीनंतर आकाश चोप्राची सडकून टीका
CISCE ICSE ICS semester I exam result declared check result at cisce org live updates