ICSE, ISC Semester 2 Exams 2022 : आयसीएसईकडून बारावीच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल, नेमकं कारण काय

काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशननं बारावीच्या सत्र 2 परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केले आहेत. बारावी परीक्षेचं नवीन वेळापत्रक cisce.org वर जाहीर करण्यात आलं आहे.

ICSE, ISC Semester 2 Exams 2022 : आयसीएसईकडून बारावीच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल, नेमकं कारण काय
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 3:37 PM

ICSE, ISC Semester 2 Time Table 2022 नवी दिल्ली: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशननं बारावीच्या सत्र 2 परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केले आहेत. बारावी परीक्षेचं नवीन वेळापत्रक cisce.org वर जाहीर करण्यात आलं आहे. आयसीएसई (ISC) बोर्डाचे विद्यार्थी संबंधित वेबसाईटवर (Website) भेट देऊन नवीन वेळापत्रक पाहू शकतात. आयसीएसईनं (ICSE) जेईई मेन परीक्षेच्या तारखा आणि बारावीच्या तारखा एकाच दिवशी येत असल्यानं हा निर्णय घेतल्याचं कळतंय. यापूर्वी नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं जेईई मेन्स परीक्षेच्या तारखा देखील बोर्ड परीक्षांच्या दिवशी येत असल्यानं बदलण्याचा निर्णय घेतला होता. आता आयसीएसई बोर्डानं त्यांच्या बारावीच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल जाहीर केले आहेत.

आयएससी 12 वी सत्र परीक्षा सीआयएससीई द्वारे घेतल्या जातात. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार यावर्षीपासून परीक्षा दोन सत्रात घेण्यात येत आहेत. त्यामुळं परीक्षेची वेळ दीड तास करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं वाचन करण्यासाठी 10 मिनिटं वेळ दिला जाणार नाही. आयएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवे बदल माहिती करुन घेण्याची आवश्यकता आहे.

आयएससी परीक्षेची डेटशीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करुन बारावीच्या परीक्षांचं आयोजन केलं जाणार आहे. अनेक राज्यांच्या बोर्डांकडून दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

जेईई तारखांमध्ये बदल

जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्रातील परीक्षा आता पाच दिवस लांबणीवर टाकऱण्यात आल्या आहेत. आता परीक्षा 21 एप्रिलपासून सुरु होणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या जेईई मेन परीक्षा 2022 च्या वेबसाईटवर जाऊन यासंदर्भातील अधिक माहिती मिळवता येईल. यापूर्वीच्या वेळापत्रका प्रमाणं जेईई मेन परीक्षा 16, 17, 18, 19, 20 21 एप्रिलला होणार होत्या. आता परीक्षा 21 एप्रिल पासून सुरु होणार आहे. नव्या तारखांनुसार परीक्षा 21, 24, 25, 29 एप्रिल 2022 आणि 01 आणि 04 मे 2022 होणार आहे.

इतर बातम्या:

मुख्यमंत्रिपदाबाबत विचारल्यावर का भडकले विश्वजीत राणे? गोव्याच्या राजकारणात चाललंय काय?

महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतली NCP अध्यक्ष शरद पवार यांची भेट; नेमकी काय झाली चर्चा?

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.