रस्ते सुरक्षा, पाणी बचत आणि वाहतुकीच्या नियमांचे धडे मिळणार आता पहिलीमध्येच, बालभारतीने उचलले मोठे पाऊल!
कोरोनानंतर आता नवीन शैक्षणिक वर्ष (Academic year) जूनमध्ये सुरू होणार आहे. विशेष म्हणजे आता पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यावर बालभारतीकडून (Balbharti) तयारीही सुरू करण्यात आली आहे. आताचा नवीन अभ्यासक्रम अनेक थीमवर विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे.
मुंबई : कोरोनानंतर आता नवीन शैक्षणिक वर्ष (Academic year) जूनमध्ये सुरू होणार आहे. विशेष म्हणजे आता पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यावर बालभारतीकडून (Balbharti) तयारीही सुरू करण्यात आली आहे. आताचा नवीन अभ्यासक्रम अनेक थीमवर विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे. कुटुंब, प्राणी, पाणी, रस्ते सुरक्षा या संकल्पनेवर आधारित असेल. याचे धडे आता विद्यार्थ्यांना पहिलीमध्येच (1 Class) मिळणार आहेत. इतकेच नाहीतर तर विद्यार्थ्यांना खेळाचे आणि चित्रकलेचे देखील विशेष शिक्षण दिले जाणार आहे.
पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये मोठे बदल
हा नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना जूनपासून मिळेल आणि तशाप्रकारच्या पाठ्यपुस्तकांची छपाईही बालभारतीकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषेसोबतच सोप्या इंग्रजी शब्दांची ओळख करून दिली जाणार आहे. मराठी वाक्यांची इंग्रजीतील वाक्यरचना अभ्यासता येणार आहे. पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी 50 लाखांहून अधिक पाठ्यपुस्तकांची छपाई महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच आपले बालभारती करत आहे.
विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी
विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी देखील बालभारतीकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे चार विषयांसाठी एकच पुस्तक विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये बालभारतीकडून मराठीसह इंग्रजीवरही जास्त जोर देण्यात आला आहे. मराठी वाक्य इंग्रजीमध्ये कसे करायचे हे देखील आता पहिलीच्याच पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळणार आहे. यामुळे पहिलीपासूनच विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा पाया पक्का होण्याची देखील शक्यता आहे.
बालभारतीकडून महत्वाचे पाऊल
शिक्षणाधिकाऱ्यांना बालभारतीला कळवावे लागणार आहे की, त्यांना किती पुस्तके लागणार आहेत. त्यानंतर नेमके किती पुस्तके छपाई करायची याचा अंदाज बालभारतीला येईल. बालभारतीकडून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. कारण विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षाही अधिक त्यांच्या दप्तराचे ओझे झाल्याचे मध्यल्या काळामध्ये दिसत होते. मात्र, विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल बालभारतीकडून उचलण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
Health : उन्हाळ्यात मधुमेहाच्या रूग्णांनी अशाप्रकारे काळजी घेणे आवश्यक, या टिप्स फाॅलो करा!
अँकिलोझिंग स्पॉन्डीलायटिसची प्रक्रिया धीमी करण्यासाठी काही महत्वाच्या सूचना, वाचा याबद्दल सविस्तर!