AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CMAT 2021 Admit Card:सीमॅट परीक्षेचे ॲडमिट कार्ड लवकरच जाहीर होणार, असं करा डाऊनलोड

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून लवकरचं (National Testing Agency)सीमॅट परीक्षेचे ॲडमिट कार्ड (CMAT Admit Card) जारी केले जाणार आहे.

CMAT 2021 Admit Card:सीमॅट परीक्षेचे ॲडमिट कार्ड लवकरच जाहीर होणार, असं करा डाऊनलोड
सीमॅट प्रवेशपत्र
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 3:28 PM

CMAT 2021 Admit Card नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून लवकरचं (National Testing Agency)सीमॅट परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड जारी केले जाणार आहे. कॉमन मॅनेजमेंट अ‌ॅडमिशन टेस्टचे आयोजन 31 मार्चला केले जाणार आहे. एनटीए द्वारे जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार सीमॅट परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड 24 मार्चला 10 वाजण्यापूर्वी जारी केले जाईल. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज भरला आहे त्यांनी ऑफिशियल वेबसाईट cmat.nta.nic.in वर जाऊन अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे. विद्यार्थ्यांनी त्यांचा परीक्षा क्रमांक अ‌ॅडमिट कार्ड आणि जन्मतारीख टाकून डाऊनलोड करता येईल. (CMAT 2021 Admit Card will released by nta on cmat nta nic in soon)

CMAT 2021 परीक्षा

कॉमन मॅनेजमेंट परीक्षा 2021 दोन शिफ्टमध्ये आयोजित केली जाणार आहे. पहिल्या सत्रातील परीक्षा 9 ते12 आणि 12.30 तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा 3 ते 6 आणि 6.30 वाजेपर्यंत होईल. ज्या उमेदवारांनी अ‌ॅडिशनल सेक्शन ”Innovation and Entrepreneurship” निवडला असेल त्यांच्यासाठी 30 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे.

CMAT Admit Card 2021 डाऊनलोड कसं करणार?

विद्यार्थ्यांनी अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट cmat.nta.nic.in वर भेट द्यावी. “CMAT 2021 admit card” लिंक वर क्लिक करावे. अ‌ॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून लॉगीन करावे. लॉगीन केल्यानंतर तुमचं अ‌ॅडमिट कार्ड तुम्हाला पाहयला मिळेल. परीक्षा केंद्रात आवश्यक असल्यानं अ‌ॅडमिट कार्डची प्रिंट काढून ठेवा.

CMAT 2021 परीक्षेचे स्वरुप

CMAT 2021 परीक्षेच्या परिपत्रकानुसार ही परीक्षा एकूण 500 गुणांसाठी होणार आहे. या परीक्षेत एकूण 125 प्रश्न विचारले जातील. 1 प्रश्नाला 4 गुण निश्चित करण्यात आले आहेत. तार्किक क्षमता आणि माहितीचे विश्लेषण यासाठी 25, लॉजिकल रिझनिंगसाठी 25, भाषा कौशल्यं 25, सामान्य ज्ञान 25, नाविन्यता आणि उद्योजकता यासाठी 25 प्रश्न विचारले जातील.

संबंधित बातम्या:

GATE 2021 परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड आले, असं कराल डाऊनलोड

SBI PO admit card: SBI कडून प्रोबेशनरी ऑफिसरसाठी अ‍ॅडमिट कार्ड जारी; जाणून घ्या डाऊनलोड करण्याचे सात टप्पे

(CMAT 2021 Admit Card will released by nta on cmat nta nic in soon)

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...