Admission Process : बारावीचा निकाल आला, प्रवेश प्रक्रिया कधीपासून, कुठे भरावा अर्ज, जाणून घ्या सर्व माहिती

Degree Admission Process : बारावीच्या निकालानंतर महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. विद्यार्थ्यांना ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करावी लागणार आहे. 12 जून 2023 पर्यंतच विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

Admission Process : बारावीचा निकाल आला, प्रवेश प्रक्रिया कधीपासून, कुठे भरावा अर्ज, जाणून घ्या सर्व माहिती
college admission
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 2:07 PM

मुंबई : विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं लक्ष लागून राहिलेल्या इयत्ता बारावीचा निकाल लागला आहे. राज्याचा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. तर विभागात कोकणने बाजी मारली आहे. तर मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. आता या निकालानंतर प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. विद्यार्थी अन् पालकांनी त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शनिवारपासून मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.

कधीपर्यंत करता येणार अर्ज

मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यांलयांमध्ये पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 27 मे (शनिवार) 2023 पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी 12 जून 2023 या अंतिम तारखेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

हे सुद्धा वाचा

तीन यादी लागणार

  • विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज केल्यानंतर महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी तीन याद्या लावण्यात येणार आहे.
  • पहिली प्रवेश यादी 12 जून
  • दुसरी यादी 28 जून
  • तिसरी यादी 6 जुलै

प्रवेश अर्ज कसा भरावा

  • प्रवेश अर्ज https://mumoa.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावरुन भरावा
  • नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना मोबाईल क्रमांकावर User Id आणि Password येईल.
  • विद्यार्थ्यांनी शैक्षणिक आणि स्वत:बद्दची माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावी.
  • सर्व माहिती आणि फोटो जोडल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपण ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेणार आहे, त्याची नोंद करावी.

बारावीचा विभागावार निकाल

  • कोकण 96.01 टक्के
  • पुणे 93.34 टक्के
  • कोल्हापूर 93.28 टक्के
  • औरंगाबाद 91.85 टक्के
  • नागपूर 90.35 टक्के
  • अमरावती 92.75 टक्के
  • नाशिक 91.66 टक्के
  • लातूर 90.37 टक्के
  • मुंबई 88.13 टक्के

पोरीच हुश्शार

यंदा इयत्ता बारावीच्या परीक्षेत एकूण 91.25 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. त्यात विद्यार्थींनींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. या परीक्षेत एकूण 6,84,118 विद्यार्थी पास झाले आहेत. तर 6,08,350 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

हे ही वाचा

Courses After HSC : बारावीनंतर काय? एका चार्टमधून जाणून घ्या सर्व अभ्यासक्रमांची माहिती

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.