AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनानं आई-वडील गमावलेल्या मुलांना सावरुया, त्यांना मोफत शिक्षण द्या, सोनिया गांधींचं नरेंद्र मोदींना पत्र

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहून एक मागणी केलेली आहे.

कोरोनानं आई-वडील गमावलेल्या मुलांना सावरुया, त्यांना मोफत शिक्षण द्या, सोनिया गांधींचं नरेंद्र मोदींना पत्र
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं पंतप्रधान मोदींना पत्र
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 4:31 PM

नवी दिल्ली: भारत सध्या कोरोनाविषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे. देशभरात आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त व्यक्तींनी कोरोनामुळे जीव गमावलेला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहून एक मागणी केलेली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे दोन्ही पालक म्हणजेच आई-वडील कमावले किंवा त्यांच्या घरातील कमावत्या पालकाचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालयांमध्ये (Navodaya Vidyalayas) मोफत शिक्षण दिलं जावं ,अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. (Congress President Sonia Gandhi write letter to PM Narendra Modi requesting provide free education at Navodaya Vidyalayas to children who have lost either both parents or an earning parent in corona )

सोनिया गांधी यांची नेमकी मागणी काय?

सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विनंती केली आहे.  कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही पालक म्हणजेच आई-वडील किंवा त्या घरातील कमावत्या पालकाचे निधन झाले आहे. त्यांना आपण नवोदय विद्यालयांमध्ये मोफत शिक्षण द्यावं, याद्वारे आपण देश म्हणून सध्या त्यांच्यावर आलेल्या दुःखद प्रसंगात आशेचा किरण निर्माण करू शकू असं सोनिया गांधी म्हणाल्या. त्यासोबतच यामुळे आपण त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी देखील प्रयत्न करू शकतो असं सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवले आहे.

सोनिया गांधी यांचे पत्र

कोरोना विषाणू संसर्गामुळे हृदयद्रावक प्रसंग आपल्याला पाहावे लागत आहेत. अनेक कुटुंब दुखद घटनांचा सामना करत आहेत. काही मुलांनी त्यांच्या दोन्ही पालकांना किंवा एका पालकांना गमावलं आहे. ही या महामारीमधील दुखद बाब आहे. या मुलांवर मोठा आघात झालेला आहे. त्यांना आता भविष्य आणि शिक्षणाबाबत आधार राहिलेला नाही, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

भारतात 661 नवोदय विद्यालयं

राजीव गांधी यांनी नवोदय विद्यालयांचं जाळं उभं केले होतं हे आपणास माहितीचं आहे. त्याद्वारे उच्च दर्जाचं आधुनिक शिक्षण गुणवत्ता असलेल्या आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळावं हा त्या मागील हेतू होता. सध्या देशभरात 661 नवोदय विद्यालयं कार्यरत आहेत. आपण कोरोनानं ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही पालक गमावले आहेत किंवा कमावत्या पालकाचं निधन झालेलं आहे, त्यांना नवोदय विद्यालयांमध्ये मोफत शिक्षण द्यावं, असं पत्र सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनानं पालक गमावेल्या विद्यार्थ्यांकडून फी घेणार नाही, ‘या’ राज्यातील खासगी शाळांचा निर्णय

CBSE चा दहावीच्या निकालाविषयी मोठा निर्णय, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण सादर करण्याबाबत महत्वाचे आदेश जारी

(Congress President Sonia Gandhi write letter to PM Narendra Modi requesting provide free education at Navodaya Vidyalayas to children who have lost either both parents or an earning parent in corona )

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.