HSC SSC : कोरोना रुग्णवाढीचं दहावी बारावीच्या पूर्व परीक्षांवर संकट, ऑफलाईन की ऑनलाईन शाळांसमोर पेच

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळं दहावी बारावीच्या पूर्व परीक्षा ऑफलाईन घ्यायच्या की ऑनलाईन घ्यायच्या असा प्रश्न शाळा महाविद्यालयांसमोर निर्माण झाला आहे. राज्यातील काही ठिकाणी पहिली ते बारावीचे ऑफलाईन वर्ग बंद करण्यात आले आहेत

HSC SSC : कोरोना रुग्णवाढीचं दहावी बारावीच्या पूर्व परीक्षांवर संकट, ऑफलाईन की ऑनलाईन शाळांसमोर पेच
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 2:01 PM

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 36265 वर गेला आहे. बुधवारी आलेल्या माहितीनुसार 24 तासात तब्बल 36 हजार 265 रुग्ण कोरोना आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येत आणखी 79 जणांची भर पडली. राज्यात आतापर्यंत 876 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 381 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांपुढे दहावी आणि बारावीच्या पूर्व परीक्षा कशा घ्यायच्या हा प्रश्न निर्माण झाला आहे. दहावी बारावीच्या पूर्व परीक्षा ऑफलाईन घ्यायच्या की ऑनलाईन घ्यायच्या असा प्रश्न शाळा महाविद्यालयांसमोर निर्माण झाला आहे. राज्यातील काही ठिकाणी पहिली ते बारावीचे ऑफलाईन वर्ग बंद करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी सुरु आहेत. दहावी बारावीचे वर्गही ऑनलाईन सुरु करण्यात आल्यानं पूर्व परीक्षांच्या आयोजनाचा प्रश्न निर्माण झालाय.

पूर्व परीक्षांचं आयोजन कसं होणार?

दहावी बारावीचे वर्ग आता ऑनलाईन सुरु करण्यात आले आहे. शाळा महाविद्यालयांनी दहावी बारावीच्या पूर्व परीक्षा जानेवारी फेब्रुवारीत प्रस्तावित केल्या होत्या. मात्र कोरोनाच्या वाढत्या स्थितीमुळं शाळा ऑनलाईन सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत राहिल्यास पूर्व परीक्षा कशी पार पडणार असा प्रश्न निर्माण झालाय.

विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचं टार्गेट

सद्यस्थितीत दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचं निश्चित असून वेगळा निर्णय घेण्यात आलेला नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचं टार्गेट असल्याचं सांगितलं आहे.

ऑफलाईन परीक्षांची तयारी सुरु

माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती आहे. दहावी आणि बारावीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गामुळे शासन स्तरावरून अद्याप कोणताही निर्णय बोर्डाला कळालेला नाही. ऑफलाईन पद्धतीने 36 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचं बोर्डाकडून नियोजन सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून टीव्ही 9 मराठीला मिळाली आहे.

इतर बातम्या:

राज्यात नाईट कर्फ्यूचा विचार, 700मेट्रीक टन ऑक्सिजन लागल्यास पूर्ण लॉकडाऊन :राजेश टोपे

Pune MHADA Lottery | पुणेकरांच्या घराचे स्वप्न पूर्ण ; पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 सदनिकांची ऑनलाईन लॉटरी सोडत संपन्न ; एसएमएसद्वारे विजेत्यांना मिळणार माहिती

Corona cases increased in state schools and colleges facing problem to conduct pre exams offline

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...