AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Board Exams Postponed: देशात कोरोनाचा वाढता कहर, बोर्ड परीक्षांवर संक्रांत, कुठे परीक्षा रद्द तर कुठे लांबणीवर

Board Exams 2021: महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. Board Exam Postponed Cancelled

Board Exams Postponed: देशात कोरोनाचा वाढता कहर, बोर्ड परीक्षांवर संक्रांत, कुठे परीक्षा रद्द तर कुठे लांबणीवर
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 4:41 PM

Board Exam 2021 नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणू संसर्ग वाढल्यानं विविध राज्यातील बोर्ड परीक्षा रद्द किंवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डानं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. सीबीएसई बोर्ड 1 जूनला कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांमधील परीक्षा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. (Corona outbreak in India impact on exams List of Board Exam 2021 Postponed or Cancelled)

कुठल्या बोर्डांनी परीक्षा लांबणीवर टाकल्या?

सीबीएसई बोर्ड (CBSE Board)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सीबीएसईच्या 10वीच्या परीक्षा रद्द केल्या. तर, 12वीच्या परीक्षांबाबत 1 जूनला निर्णय घेण्यात येणार आहे. 10 वीचा निकाल सीबीएसई एक आराखडा निश्चित करेल त्यानुसार जाहीर केला जाईल. तर, ज्या विद्यार्थ्यांना निकाल मान्य नसेल त्यांची कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहेत.

यूपी बोर्ड (UP Board)

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश बोर्डानं परीक्षा स्थगित केल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा 20 मे पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

ICSE बोर्ड

COVID-19 च्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने ICSE च्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षांबाबत जून महिन्यात निर्णय घेण्यात येणार आहेत.

राजस्थान बोर्ड (Rajasthan Board)

राजस्थान बोर्डानं 10वी आणि 12वीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. तर 9 वी, 8 वी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेतलाय.

मध्य प्रदेश बोर्ड (MP Board)

मध्य प्रदेश बोर्डानं देखील परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, दहावी आणि बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.

उत्तराखंड बोर्ड (Uttarakhand Board)

उत्तराखंड बोर्डाने 10वी च्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर, बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.

हरियाणा बोर्ड (Haryana Board)

हरियाणा सरकारने 10 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांना पास कसं करणार याबाबत फॉर्म्युला ठरलेला नाही. हालांकि अभी हरियाणा बोर्ड ने 10वीं के छात्रों का रिजल्ट निकालने का फॉर्मूला स्पष्ट नहीं किया है.

महाराष्ट्र बोर्ड (Maharashtra Board)

महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्ग पाहता 10 वी आणि बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

छत्तीसगड बोर्ड (CGBSE Board)

वाढत्या कोरोना रुग्णसंखेमुळे छत्तीसगडमध्ये 10 वीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.

हिमाचल बोर्ड (HPBOSE Board)

हिमाचल मध्ये बोर्ड परीक्षा 17 मे पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

झारखंड बोर्ड (JAC Board)

झारखंड अकॅडमीक काऊन्सिलच्यावतीनं (JAC) 4 मे पासून होणारी दहावी आणि बारावीची परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे

ओडिशा बोर्ड (Odisha Board)

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यात दहावीच्या बोर्ड परीक्षा जून 2021 पर्यंत लांबवणीवर टाकण्याचे आदेश दिले आहेत.

मणिपूर बोर्ड (Manipur Board)

मणिपूरमधील 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या:

सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; दहावीची परीक्षा कधी होणार?

CBSE Board Exam: सीबीएसईकडून प्रात्याक्षिक परीक्षेसाठी फोटो अपलोडिंग अनिवार्य, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

Corona outbreak in India impact on exams List of Board Exam 2021 Postponed or Cancelled

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.