बारावीनंतरचे अभ्यासक्रम : IIT मद्रासचा ऑनलाईन डाटा सायन्स डिप्लोमा, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
बारावीचे निकाल जाहीर झाले असून येत्या काही दिवसांमध्ये सगळीकडं प्रवेशाची धांदल सुरु होईल. बारावीनंतर आर्टस, कॉमर्स आणि सायन्स या पारंपारिक विद्याशाखांसोबत आता ऑनलाईन अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो.
मुंबई: बारावीचे निकाल जाहीर झाले असून येत्या काही दिवसांमध्ये सगळीकडं प्रवेशाची धांदल सुरु होईल. बारावीनंतर आर्टस, कॉमर्स आणि सायन्स या पारंपारिक विद्याशाखांसोबत आता ऑनलाईन अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रासनं ऑनलाईन डाटा सायन्स अभ्यासक्रमसााठी अर्ज मागवले आहेत. विद्यार्थ्यांना जेईई परीक्षा न देताही अर्ज करता येणार आहेत. विद्यार्थी डिप्लोमा प्रोग्रामिंग आणि डेटा सायन्स अभ्यासक्रम त्यांच्या नियमित अभ्यासक्रमासोबत याचं शिक्षण घेऊ शकतात. राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुषंगून या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.
30 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी
आयआयटी, मद्रासमध्ये ऑनलाईन डेटा सायन्स अभ्यासक्रमाला अर्ज करण्यासाठी 30 ऑगस्ट ही मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्या तारखेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. इच्छूक उमेदवार https://onlinedegree.iitm.ac.in या वेबसाईटवर अर्ज सादर करु शकतील या अभ्यासक्रमाला यापूर्वी 70 हून अधिक कंपन्यांच्या सीईओंनी, अधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला होता.
नेमकी प्रक्रिया कशी?
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर निवड प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे. आयआयटी मद्रास चार आठवड्यांचा ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करेल. त्यामध्ये तज्ज्ञांची लेक्चर्स, असाईनमेट, लाईव्ह डिसक्शन घेतली जाईल. ऑनलाईन असाईंनमेंट घेतल्यानंतर विद्यार्थी अभ्यासक्रमाला पात्र ठरतील.पात्र विद्यार्थ्यांना फाऊंडेशनला प्रवेश दिला जाईल.
अर्ज कोण करु शकतं?
डाटा सायंटिस्ट निर्माण करणं हा या ऑनलाईन अभ्यासक्रमाचा हेतू आहे. जे विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण असतील आणि ज्यांनी दहावीमध्ये इंग्रजी आणि गणित विषयाचा अभ्यास केला आहे ते, अर्ज करु शकतात. ऑनलाईन अभ्यासक्रम असल्यानं विद्यार्थी कोणत्याही ठिकाणाहून शिकू शकतात. पुढील क्वालिफायर बॅच सप्टेंबर 2021 पासून सुरु होणार आहे.
आयआयटी मद्रासच्या या अभ्यासक्रमाद्वारे मोठ्या संख्येनं डाटा सायंटिस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन मार्गदर्शक, परीक्षा याद्वारे हा अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल.
इतर बातम्या:
मोठी बातमी ! राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश हवाय? नावनोंदणी सुरु, संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर
Courses After class 12 applications open for online date science programme by IIT Madras