बारावीनंतर पुढे काय? जाणून घ्या, ऊर्जा व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक्रमांविषयी

सध्या जगाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येची ऊर्जेची गरज भागवून त्या ऊर्जेचे व्यवस्थापन करणं हा देखील एक महत्वाची बाब आहे. मानव आणि पर्यावरण यांच्या हितासाठी ऊर्जा व्यवस्थापन आणि शाश्वत ऊर्जा निर्मिती करणं ही महत्त्वाची गोष्ट झाली आहे.

बारावीनंतर पुढे काय? जाणून घ्या, ऊर्जा व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक्रमांविषयी
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 8:18 AM

मुंबई: सध्या जगाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येची ऊर्जेची गरज भागवून त्या ऊर्जेचे व्यवस्थापन करणं हा देखील एक महत्वाची बाब आहे. मानव आणि पर्यावरण यांच्या हितासाठी ऊर्जा व्यवस्थापन आणि शाश्वत ऊर्जा निर्मिती करणं ही महत्त्वाची गोष्ट झाली आहे. भारतात देखील वाढत्या लोकसंख्येला मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची विजेची गरज आहे. यामध्ये पर्यावरणाचा रास न होता शाश्वत पद्धतीने ऊर्जेची गरज पूर्ण होणं आवश्यक आहे.

ऊर्जा व्यवस्थापनाचं महत्व

पर्यावरणपूरक शाश्वत उर्जा निर्मिती आणि उर्जा व्यवस्थापन तंत्र तयार व्हावे यासाठी भारतात ठिकठिकाणी अभ्यासक्रम चालवले जातात. ऊर्जा व्यवस्थापनातील अभ्यासक्रम हे पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा आणि पीएचडी या पातळीवर घेतले जातात. हे अभ्यासक्रम वैविध्यपूर्ण देखील आहेत. ऊर्जा व्यवस्थापन अभ्यासक्रमामध्ये जगभरातल्या संपूर्ण उद्योग क्षेत्र केंद्रस्थानी आहे. हा अभ्यासक्रम केवळ ऊर्जा निर्मिती केंद्रांमध्ये किंवा वीजनिर्मिती केंद्रांमध्ये मर्यादित नसून या क्षेत्रातील नवनव्या संकल्पनांचं समोर येणं आवश्यक आहे.

ऊर्जा व्यवस्थापनामध्ये विद्यार्थ्यांना ऊर्जेचा योग्य वापर, ऊर्जेचा वापर बद्दलचे धोरण, ऊर्जा वापरातील निर्माण होणाऱ्या समस्यांचं निराकरण करणे, वीज वितरण, पॉवर ऑपरेशन मॅनेजमेंट या संदर्भात शिक्षण दिले जातं. पदवी अभ्यासक्रमांसाठीची पात्रता ही बारावी विज्ञान असणं आवश्यक आहे.

ऊर्जा व्यवस्थापनातील अभ्यासक्रम

उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय त्या उमेदवाराला बारावीला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये किमान 50 टक्के गुण मिळालेले असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना त्यामुळं बी.टेक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. या क्षेत्रातील अभ्यासक्रमांचे प्रवेश हे राष्ट्रीय पातळीवरील आणि राज्य पातळीवरील प्रवेश परीक्षांद्वारे घेतले जातात. सीएटी, सीएमएटी, एमएटी, एमएचटी-सीईटी याद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. पदवी अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळे विद्यापीठांचे निकष वेगळे असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते निकष तपासून घेणे आवश्यक आहे.

पावर मॅनेजमेंट मधील करिअर संधी

ऊर्जा व्यवस्थापन हे उद्योग क्षेत्राचं हृदय म्हणून समजले जाते. कापड उद्योग असो की ऑटोमोबाईल क्षेत्रात ऊर्जा व्यवस्थापनाला फार महत्व आहे.गेल्या काही वर्षांमध्ये ऊर्जेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे त्यामुळे ऊर्जा व्यवस्थापन हे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे ऊर्जा व्यवस्थापनातील शिक्षण झालेलं असेल त्यांना पुढील काळात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

ऊर्जा व्यवस्थापन अभ्यासक्रमानंतर नोकरीची संधी

उर्जा व्यवस्थापनातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना टेक्निशियन, इंडस्ट्रिअल इंजिनिअर, प्रॉडक्शन मॅनेजर, मॅनेजर, सीनियर प्रोजेक्ट कन्सल्टंट, सर्विस मॅन इंजिनियर, या पदांवर काम करण्याची संधी मिळते. रिलायन्स इंडस्ट्रीज, एमपीसीआय, सीएलपी पॉवर, अदानी इलेक्ट्रॉनिक्स, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन एनर्जी, एनटीपीसी संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळते. हे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना 4 लाख ते 11 लाखापर्यंत पगाराची संधी आहे.

ऊर्जा क्षेत्रातील अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था

देशभरातील आयआयटी संस्था, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ एनर्जी रिसर्च, स्कूल ऑफ एनर्जी स्टडीज, जाधवपूर विद्यापीठ, कोलकाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जयपूर विद्यापीठ आदीमध्ये हे अभ्यासक्रम चालवले जातात. फी संदर्भातील अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थांच्या वेबसाईटला भेट देऊन माहिती घेणं आवश्यक आहे.

इतर बातम्या:

भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण, मुंबई बाजार समितीकडे ग्राहकांची पाठ, हे पहिल्यांदाचं घडतंय, व्यापाऱ्यांचं मत

‘महामार्गांच्या कामाला शिवसेनेचा विरोध नाही’, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वाशिमच्या सेना लोकप्रतिनिधीचा दावा

Courses after class 12 know details about power management courses and scope

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.