CUET PG 2022: फॉर्म जारी ! सर्व कार्यकर्त्यांना विनंती, सगळी कामं सोडून आधी फॉर्म भरावेत, शिक्षण महत्त्वाचं…

हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा घेण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आलीये परंतु तारीख निश्चित करणं बाकी आहे. आता पीजीसाठी CUET जाहीर झाल्यानंतर पीजी आणि युजी परीक्षा एकाच वेळी घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

CUET PG 2022: फॉर्म जारी ! सर्व कार्यकर्त्यांना विनंती, सगळी कामं सोडून आधी फॉर्म भरावेत, शिक्षण महत्त्वाचं...
कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षाImage Credit source: Official Website Of NTA
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 12:20 PM

मुंबई : कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा (Common University Entrance Test) , सीयूईटी पीजी (CUET PG) साठी अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. पीजी अभ्यासक्रमासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार एनटीए (NTA) च्या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकतो. एनटीए च्या अधिकृत वेबसाईटवर फॉर्मची लिंक काल 19 मे 2022 ला सुरु करण्यात आली आहे. हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा घेण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आलीये परंतु तारीख निश्चित करणं बाकी आहे. आता पीजीसाठी CUET जाहीर झाल्यानंतर पीजी आणि युजी परीक्षा एकाच वेळी घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

CUET PG परीक्षा पॅटर्न

CUET UG चा परीक्षा पॅटर्न आधीच प्रसिद्ध झाला आहे. परीक्षा पद्धतीनुसार, परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाईल. CUET PG साठी अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण हाच पॅटर्न पीजीसाठी वापरला जाईल, अशी अट आहे. मात्र यासाठी अधिकृत घोषणा होणे आवश्यक आहे.

असा भरा फॉर्म

  • CUET च्या अधिकृत वेबसाईटवर cuet.nta.nic.in जा
  • होम पेजवर CUET PG येईल तिथे क्लिक करा
  • सगळी माहिती भरून फॉर्म भरा
  • जी कागदपत्रं अपलोड करायला सांगितली आहेत ती अपलोड करा
  • फॉर्म फी भरा
  • फॉर्म सबमिट करा
  • फॉर्मची प्रिंट आऊट जवळ ठेवा

यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांची माहिती

यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे. PG साठी CUET अर्ज आज म्हणजेच 19 मे रोजी NTA च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाईल. सेंट्रल युनिव्हर्सिटी (PG प्रवेश 2022) मधील पीजी कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश घेऊ शकतात. परीक्षेबाबत यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी सांगितले की, जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा घेतली जाईल.

हे सुद्धा वाचा

CUET पुढील वर्षापासून दोनदा

कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट पुढील वर्षापासून म्हणजेच 2023 पासून दोनदा घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत चांगले गुण मिळवू शकले नाहीत त्यांच्याकडे चांगले गुण मिळवायची अजून एक संधी उपलब्ध असणार आहे. पुढच्या वर्षापासून या दोन्ही परीक्षा बारावीच्या परीक्षेनंतर 45 दिवसांच्या अंतराने घेतल्या जातील. जे विद्यार्थी पहिल्या संधीत चांगला स्कोअर करू शकले नाहीत ते दुसऱ्या ते दुसऱ्यांदा परीक्षा देऊन स्कोअर करू शकतात. सीयूईटी परीक्षा बारावीच्या एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.