Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Schools : मुंबई महानगपालिकेच्या शाळेत आर्थिक साक्षरता मिशन ! आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम, मिळणार आर्थिक साक्षरतेचे धडे

राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला जातोय.

BMC Schools : मुंबई महानगपालिकेच्या शाळेत आर्थिक साक्षरता मिशन ! आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम, मिळणार आर्थिक साक्षरतेचे धडे
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 5:29 PM

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) शाळांमधली बरीचशी मुलं ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. या विद्यार्थ्यांच्या (Students) कुटुंबाचा भविष्यात आर्थिक स्तर उंचावला जावा, यासाठी ‘आर्थिक साक्षरता मिशन’ अंतर्गत शालेय जीवनातच इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे (Financial Literacy) धडे देण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतलाय. राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला जातोय. या मिशनसाठी उद्या 11 एप्रिल 2022 ला दुपारी 12 वाजता बृहन्मुंबई महानगरपालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) इन्स्टिट्यूट लि. दरम्यान सामंजस्य करार होणार आहे. हा करार बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सभागृहात आदित्य ठाकरेंच्या उपस्थित होणार आहे.

आर्थिक साक्षरतेचे धडे देण्यासाठी अभ्यासक्रम निश्चित

इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे देण्यासाठी अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलाय. हा अभ्यासक्रम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) इन्स्टिट्यूट लि. च्या मदतीनं निश्चित करण्यात आलाय. या अभ्यासक्रमाची पुस्तिका तयार करण्यात आलीये. या पुस्तिकेचा प्रकाशनसोहळा आणि आर्थिक साक्षरता मिशनचा शुभारंभ आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्या होणार आहे. या समारंभास महानगरपालिकेचे सहआयुक्त (शिक्षण) श्री. अजित कुंभार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिषेक कुमार चौहान, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) इन्स्टिट्यूट लि. चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंबरीष दत्ता या मान्यवरांसह शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग व मास्टर ट्रेनरसाठी निवड करण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या शाळांमधील १०० शिक्षक उपस्थित राहणार आहेत.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) इन्स्टिट्यूट लि.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) इन्स्टिट्यूट लि. ही कंपनी गेली १४७ वर्षे भांडवली बाजारातील सहभागींना जोखीम व्यवस्थापन, क्लिअरिंग, सेटलमेंट, मार्केट, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, आर्थिक तंत्रज्ञान, आर्थिक सुरक्षेबाबत कायदा, पत्रकारिता, नेतृत्व, डोमेन क्षेत्रात औद्योगिक संबंधित कार्यक्रम यासंबंधी शिक्षण व इतर अनेक सेवा पुरवते.

100 मास्टर ट्रेनर्सना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) इन्स्टिट्यूट लि. मार्फत 100 मास्टर ट्रेनर्सना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या इतर सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना येत्या जूनमध्ये सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापासून आर्थिक साक्षरतेचे धडे मिळणार आहेत.

सर्वसामान्य गटातील पालकांचा व देशामध्ये मुंबईचा आर्थिक स्तर उंचावला जावा यासाठी ‘आर्थिक साक्षरता मिशन’ अंतर्गत होणारा हा करार महत्वाचा आहे.

इतर बातम्या :

CM Uddhav Thackeray : ‘जाऊ दे! जीभ अडकायची माझी’ चंद्रकांत पाटलांवर टीका करताना असं का म्हणाले ठाकरे?

बाळासाहेबांचा आदर आहे म्हणता तर शहांनी दिलेला शद्ब का पाळला नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

आता व्हाट्सॲपच्या ‘या’ नव्या चॅटबॉक्सद्वारे मिळवा हेल्थ टिप्स्‌

जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना.
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन.
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार.
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?.
गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं
गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं.
'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्...
'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्....
पंतप्रधान 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका, राऊतांची टीका
पंतप्रधान 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका, राऊतांची टीका.
'त्यांचा घराचा पत्ता काढणार आणि घरी येऊन...', सोमय्यांना FB वरून धमकी
'त्यांचा घराचा पत्ता काढणार आणि घरी येऊन...', सोमय्यांना FB वरून धमकी.
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी.
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं.