11th Admission Process: प्रवेश प्रक्रिया आरंभ कियी जाय! विद्यार्थी तय्यार? महत्त्वाच्या तारखा एकदा नजरेखालून घाला…

विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. राज्यातील मुंबई, ठाण्यासह, पुणे, पिंपरीचिंचवड, अमरावती आणि नागपूरमध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसं पत्रक काढून शिक्षण विभागाने या संदर्भातील माहिती दिली आहे.

11th Admission Process: प्रवेश प्रक्रिया आरंभ कियी जाय! विद्यार्थी तय्यार? महत्त्वाच्या तारखा एकदा नजरेखालून घाला...
प्रवेश प्रक्रिया आरंभ कियी जाय! विद्यार्थी तय्यार? Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 12:38 PM

मुंबई:  इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची (11th Admission process) लगबग सुरू झालीये. 27 मे पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचा सराव करता (मॉक अर्ज) येणार होता.  11वीत प्रत्यक्ष प्रवेश घेण्याआधी अर्ज भरायचा सराव व्हावा यासाठीची ही सोय होती. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना उद्यापासून म्हणजेच 30 मेपासून प्रवेश अर्जाचा पहिला भाग तर 10 वीच्या निकालानंतर प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे (Important Dates of 11th Admission Process), अशी माहिती शिक्षण विभागाने (Education Department) दिलीये. विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. राज्यातील मुंबई, ठाण्यासह, पुणे, पिंपरीचिंचवड, अमरावती आणि नागपूरमध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसं पत्रक काढून शिक्षण विभागाने या संदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची उत्कंठा संपुष्टात येणार आहे. उद्यापासून विद्यार्थ्यांना प्रवेशाचा पहिला भाग भरता येणार आहे.

प्रवेश प्रक्रिया अशी असणार

विद्यार्थ्यांना 27 मेपर्यंत अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. त्यानंतर सराव केलेली ही माहिती 28 मे रोजी नष्ट करता येईल. त्यानंतर 30 मे रोजी प्रत्यक्षात अर्ज भरता येणार आहे. प्रत्यक्षात अर्ज भरण्याचे दोन टप्पे करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 30 मे रोजी विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती भरायची आहे. त्यानंतर दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयांची निवड करावी लागणार आहे. तसेच अर्जात टक्केवारी नमूद करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेची अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास http://11thadmission.org.in या वेबसाईटला भेट द्यावी. शाळा आणि ज्युनिअर कॉलेजसाठी प्रशिक्षण वर्गातून पालक आणि विद्यार्थ्यांना माहिती द्वावी, असंही आवाहन शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केलंय.

अर्ज भरण्याचा सराव म्हणजे काय?

केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. 30 मे पासून ही प्रक्रिया सुरू होईल. त्यापूर्वी आजपासून ते 27 मेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. प्रत्यक्षात अर्ज भरताना कोणत्याही चुका होऊन अर्ज बाद होऊ नये म्हणून आजपासून ते 27 मे पर्यंत मॉक डेमो रजिस्ट्रेशन म्हणजे अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा

दोन वर्ष कोरोनाचं संकट होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा द्यावी लागली होती. यंदा पहिल्यांदाच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देता आली होती. एकट्या ठाणे जिल्ह्यातूनच 1 लाख 22 हजार 269 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.