दहावीच्या परीक्षा कशा घ्यायच्या? धनंजय कुलकर्णींकडून वर्षा गायकवाड यांना निवेदन, वाचा सविस्तर
दहावीच्या परीक्षा कशा पद्धतीनं आयोजित करता येतील याबाबत वर्षा गायकवाड यांना धनंजय कुलकर्णी यांनी निवेदन दिलं आहे. (Dhananjay Kulkarni Varsha Gaikwad)
मुंबई: राज्य सरकारने कोरोना विषाणू संसर्गाचं कारण देतं दहावीची परीक्षा न घेण्याचा निर्णय 20 एप्रिल रोजी घेतला आहे. हा निर्णय रद्द करावा आणि दहावीच्या परीक्षा घेण्यात याव्यात या मागणीसाठी पुणे येथील प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका केली आहे. याच प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी आता राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना एक निवेदन पाठवलं आहे. आणि त्यात दहावीची परीक्षा घेतली जाऊ शकते,याबाबत सविस्तर मांडणी केली आहे. दहावीची परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाऊ शकते, धनंजय कुलकर्णी असं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. (Dhananjay Kulkarni submit memorandum to education minister Varsha Gaikwad how SSC exam can Conducted during corona)
धनंजय कुलकर्णी यांनी निवेदनात मांडलेल्या सूचना नेमक्या काय?
प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देऊन 10 वीच्या परीक्षा कशा घेता येतील याबाबात सूचना केल्या आहेत. त्यामध्ये शाळेमध्येच परीक्षा, दोन गटात विभागणी, दोन प्रश्नपत्रिका, विद्यार्थ्यी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांना प्रवेश, कोरोना चाचणी, मास्क लावणे, दोन सत्रात परीक्षा, शाळेतीलच शिक्षकांकडून पेपर तपासणी याद्वारे पुढील 105 दिवसांमध्ये दहावीचा निकाल जाहीर करता येईल, असं धनंजय कुलकर्णी म्हणाले आहेत.
प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी केलेल्या सूचना
- दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांची शाळा परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावी.
- दहावीतील विद्यार्थ्यांची संख्या दोन गटात विभागण्यात यावी.
- त्यांची स्वतंत्र वेळेत आणि वेगळ्या प्रश्न संच यानुसार परीक्षा
- प्रत्येक शाळेतील चौथी ते दहावीचे वर्ग परीक्षेसाठी घेण्यात यावेत. त्यांचं निर्जंतुकीकरण करण्यात यावं.
- परीक्षा केंद्रावर केवळ विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनाच प्रवेश देण्यात यावा.
- पालकांना प्रवेश परीक्षा केंद्रात प्रवेश देऊ नये
- परीक्षा केंद्रात सुरक्षाव्यवस्था देण्यात यावी.
- परीक्षा केंद्रात प्रवेश करणाऱ्याकडे कोरोना टेस्ट प्रमाणपत्र मागण्यात यावं.
- परीक्षा केंद्रात प्रवेश केल्यावर मुखपट्टी लावणं बंधनकारक करावं
- परीक्षेपूर्वी शाळेच आणि वर्गाच निर्जंतुकीकरण करण्यात यावं.
- विद्यार्थ्यांना घर ते परीक्षा केंद्र या प्रवासासाठी सरकारी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
- विद्यार्थ्यांची परीक्षा दोन गटात घेण्यात यावी.
- एका गटाची परीक्षा सकाळी 10 ते 12 या वेळेत घ्यावी. तर दुसऱ्या गटाची परीक्षा दुपारी 2 ते 4 या वेळेत घेण्यात यावी.
- यामुळे एका वर्गात केवळ 6 विद्यार्थ्यां बसणार आहेत. नियमांचं पालन होणार आहे.
- यासाठी परीक्षा मंडळाला दोन पेपर काढावे लागणार आहे.
- ज्या शाळेत परीक्षा झाली आहे,त्याच शाळेत उत्तर पत्रिका तपासण्यात याव्यात. त्या साठी जवळच्या शाळेच्या शिक्षकांची मदत घ्यावी.हे पेपर तपासातील , गुण देतील.
- अशा पद्धतीने 15 दिवसात 10 वीची परीक्षा पार पडेल आणि पुढच्या 105 दिवसात त्याची तपासणी होऊन निकाल लागू शकतो , अस , प्रा. कुलकर्णी यांनी आपल्या निवेदनात म्हटल आहे.
महाराष्ट्र शासन दहावी परीक्षेबाबत शासन निर्णय काढणार?
राज्य सरकारचा शिक्षण विभाग दहावीबाबत दोन महत्त्वाचे जीआर काढणार असल्याची माहिती आहे. या शासन निर्णयांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना कसं उत्तीर्ण करायचं याबाबतचे निकष याविषयची माहिती असेल. दुसऱ्या शासन निर्णयात अकरावीचे प्रवेश कसे होणार याचे निकष शिक्षण विभागाकडून जाहीर केले जातील.
शासन निर्णयाची माहिती मुंबई हायकोर्टाला कळवणार
राज्याच्या शिक्षण खात्यांच्या अधिकाऱ्यांनी काल आणि आज अशी दोन दिवस राज्याचे महाधिवक्तां यांच्याबरोबर चर्चा केली असल्याची माहिती आहे. राज्य शासनाकडून काढण्यात येत असलेल्या शासन निर्णयाची माहिती मुंबई हायकोर्टात दिली जाणीर आहे. या दोन्ही जीआरची माहिती गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली जाणार असल्याच स्पष्ट झालं आहे.
संबंधित बातम्या:
दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावर राज्य सरकार ठाम, दोन दिवसांत अंतिम निर्णय, सूत्रांची माहिती
(Dhananjay Kulkarni submit memorandum to education minister Varsha Gaikwad how SSC exam can Conducted during corona)