मुंबई: आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा शिगेला पोहोचली असताना स्मार्ट वर्कर्सची मागणीही झपाट्याने वाढत आहे. कमी वेळात अधिक डिमांडिंग कोर्स करून लवकरात लवकर प्लेसमेंट मिळावी अशी बहुतेकांची इच्छा असते. बारावी पाससाठी अनेक पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे कोर्स केल्यानंतर लाखो नोकऱ्या सहज मिळू शकतात. IT कंपन्या आयटी क्षेत्र आणि संगणक क्षेत्रातील पदविकाधारकांना मोठ्या पॅकेजवर नियुक्त करत आहेत. हे अभ्यासक्रमही अनेक अव्वल संस्थांकडून दिले जातात. चला जाणून घेऊया या कोर्सेसबद्दल.
जर तुम्ही बारावी पास असाल आणि तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर तुम्ही शॉर्ट टर्म कोर्स किंवा डिप्लोमा प्रोग्राम म्हणून ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स निवडू शकता. न्यूज चॅनल्सपासून ते बिग बजेट चित्रपटांसाठी ॲनिमेशनचा वापर केला जातो. अशा तऱ्हेने या क्षेत्रात उत्तम कौशल्य असणाऱ्यांना कोट्यवधींच्या पॅकेजवर कामावर घेतले जाते. हा अभ्यासक्रम 1 वर्षाचा आहे.
जगभरातून मोठ्या प्रमाणात डेटा चे उत्पादन होत असल्याने डेटा विश्लेषकांची मागणी झपाट्याने वाढली आहे. डेटा सायन्स डिप्लोमा प्रोग्राम अनेक नामांकित संस्थांद्वारे आयोजित केला जातो. प्रोग्रॅमिंग लँग्वेज आणि स्टॅटिस्टिक्स शिकण्याची संधी आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला खालील पोस्टवर काम करण्याची संधी मिळते-
हे मोबाईल फोनचे युग आहे. हल्ली मोबाईल फोन आणि त्याच्या ॲप्लिकेशन्सचा वापर झपाट्याने वाढला आहे. ॲप डेव्हलपमेंटच्या ट्रेंडमुळे मोबाइल ॲप्लिकेशन्स आणि त्याच्या डेव्हलपमेंटला मोठी मागणी निर्माण झाली आहे. या क्षेत्रातील बारावीनंतरच्या अल्पमुदतीच्या पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी 6 महिन्यांचा आहे. हा कोर्स केल्यानंतर ॲप्लिकेशन डिझायनर, ॲप्लिकेशन डेव्हलपर आणि ॲप टेस्टर अशा पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते.