PG प्रोग्रामसाठी प्रवेश प्रकियेला सुरुवात… पात्रता व महत्वाच्या तारखा जाणून घ्या
दिल्ली विद्यापीठ प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) 15 मे रोजी DU PG 2022 अर्ज प्रक्रिया बंद करणार असून साधारणत: जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात ही परीक्षा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नवी दिल्लीः दिल्ली विद्यापीठाकडून (DU) DU PG प्रवेश प्रक्रियेला आजपासून (6 एप्रिल) सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी admission.uod.ac ही अधिकृत वेबसाइट विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. DU PG साठी अर्ज भरुन तो ‘सबमिट’ करण्याची शेवटची तारीख 25 मे असणार आहे. PG प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार डीयु नोंदणी पोर्टलवर दिल्ली विद्यापीठ प्रवेश परीक्षेसाठी (DUET) स्वतःची नोंदणी करू शकणार आहेत. याबाबत अधिक माहिती देताना कुलगुरू योगेश सिंह यांनी सांगितले, की दिल्ली विद्यापीठात 50 टक़्के जागा विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील, तर उर्वरीत 50 टक्के जागा दिल्ली विद्यापीठ प्रवेश परीक्षा प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत. त्याच प्रमाणे परीक्षा केंद्र म्हणून 28 शहरांची (28 cities) निवड करण्यात आली असल्याचीही माहिती कुलगुरु सिंह यांनी दिली. प्रत्येक राज्यात एक केंद्रांची निवड करण्यात आली आहे. पीजी प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया आणि पात्रता या बाबी आवश्यक राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी विद्यापीठाच्या नियमांची तसेच उमेदवारांसाठीच्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. खालील पात्रता आवश्यक राहणार आहे :
1) पदव्युत्तर प्रवेशास पात्र होण्यासाठी, अर्जदारांनी मान्यताप्राप्त संस्थेत बॅचलर डिग्री प्रोग्राम पूर्ण केलेला असावा. यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची किमान टक्केवारी ही प्रोग्रामनुसार बदलत असते.
2) एमसीआय (Medical Council of India), एआयसीटीई (All India Council of Technical Education), आणि बीसीआय (Bar Council of India) यांनी किमान वय विहित केलेले अभ्यासक्रम वगळता विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांद्वारे देण्यात आलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना किमान वयाची अट राहणार नाही.
दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात DUET परीक्षा घेईल. पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी दिल्ली विद्यापीठाचे प्रवेश अंतिम पात्रता परीक्षा आणि लेखी प्रवेश परीक्षेवर आधारित असणार आहेत. दरम्यान, यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखत आणि गट चर्चेतदेखील भाग घ्यावा लागणार आहे. लवकरच डीयू पीजी प्रवेश परीक्षेच्या यादीच्या आठ फेऱ्या जाहीर केल्या जातील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
Big Breaking : मुंबईत 99.13 टक्के रुग्णांमध्ये ओमायक्रॉन, जिनोम सिक्वेसिंगचा चकीत करणारा अहवाल
प्रकल्पबाधितांना मुद्रांक शुल्क माफ करा; राष्ट्रवादीचे माजी गटनेते नजीब मुल्ला यांची मागणी