जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून लवकरच प्रस्ताव, 35 हजार शिक्षक, कर्मचाऱ्यांना फायदा होणार

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि सर्व शिक्षक, पदवीधर आमदार यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत शिक्षणमंत्री यांनी वाढीव पदाबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळासमोर सादर करण्याची सकारात्मक भूमिका जाहीर केली. तसेच शिक्षक, कर्मचारी यांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बैठक होती. यामुळे शिक्षक, […]

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून लवकरच प्रस्ताव, 35 हजार शिक्षक, कर्मचाऱ्यांना फायदा होणार
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 8:18 AM

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि सर्व शिक्षक, पदवीधर आमदार यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत शिक्षणमंत्री यांनी वाढीव पदाबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळासमोर सादर करण्याची सकारात्मक भूमिका जाहीर केली. तसेच शिक्षक, कर्मचारी यांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बैठक होती. यामुळे शिक्षक, कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळेल. विशेष म्हणजे या बैठकीनंतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचा आदेश शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण आयुक्त यांना दिला आहे.

प्रत्येक विषयाला शिक्षक, शाळा तिथे मुख्याध्यापक पाहिजे

या बैठकीत आमदार कपिल पाटील यांनी प्रत्येक विषयाला शिक्षक मिळाला पाहिजे, शाळा तिथे मुख्याध्यापक पाहिजे आणि कला – क्रीडा शिक्षकांना संचमान्यतेत स्थान मिळाले पाहिजे असे मुद्दे मांडले. शिक्षणमंत्र्यांनी आमदार कपिल पाटील यांचे मुद्दे मान्य करत तातडीने यासंदर्भात नवीन संचमान्यता लागू करण्याचे आश्वासन दिले.

जुनी पेन्शन योजनेसाठी प्रस्ताव तयार करण्याचा आदेश

तसेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त सर्व अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, वाढीव तुकड्यांवर कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लावण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचा आदेश शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण आयुक्त यांना दिले. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मान्य केल्यास राज्यातील 35 हजार शिक्षक, कर्मचारी यांना जुनी पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल, असा विश्वास आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

पूर्णवेळ संगणक शिक्षक मिळाला पाहिजे

डिजिटल युगामध्ये संगणक शिक्षण अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. कोरोनाकाळात ऑनलाईन शिक्षणाचा प्रयत्न केला गेला. या सर्व पार्श्वभूमीवर शाळा तिथे पूर्णवेळ संगणक शिक्षक मिळाला पाहिजे, तसेच यापूर्वी कार्यरत शिक्षकांना मान्यता देऊन त्यांच्याही सेवा पूर्वरत करण्याची मागणी आमदार कपिल पाटील यांनी यावेळी केली. शिक्षण, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यादृष्टीने सकारात्मक बदल घडवणारी ही बैठक 17 नोव्हेंबर रोजी पार पडली.

इतर बातम्या :

MHT CET: सीईटी कक्षाकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नोंदणीला मुदतवाढ, नेमकं कारण काय?

Maharashtra School Reopen: कोरोना रुग्ण घटले, दिवाळी संपली, पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता

Chhorii | शूटिंगच्या आधीपासूनच प्रेग्नंट बॉडी सूट घालण्यास सुरुवात, नुसरत भरुचाने ‘छोरी’ चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी अशी केली तयारी!

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.