पोरांनो आता अभ्यास करावा लागणार! पालक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
निर्णय केवळ चर्चेच्या पातळीवर असून या संदर्भात शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय अंतिम केला जाणार आहे.
पुणे : शाळेतील विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत सरसकट पास केलं जात होतं. म्हणायला विद्यार्थ्यांची चंगळच होती पण यात नुकसान होत असल्याचीही पालकांची तक्रार होती. दरम्यान या संदर्भातली मोठी बातमी हाती येतीये. परीक्षा गांभीर्याने घेतल्या जात नाहीत म्हणून यावर तोडगा काढला जाणार आहे. आता तिसरीपासून परीक्षा घेण्याचा विचार सुरु असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी दिलीये. परीक्षेबरोबरच एटीकेटी (Allowed to keep terms) सुरु करता येणार का याचाही विचार केला जाणारे. हा निर्णय केवळ चर्चेच्या पातळीवर असून या संदर्भात शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय अंतिम केला जाणार आहे.
दीपक केसरकर म्हणाले, तिसरीपासून परीक्षा घेण्याचा विचार आहे. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना एटीकेटी सुरु करता येईल का, याबाबत देखील विचार करण्यात येणार आहे.
आठवीपर्यंत परीक्षा घेतल्या जात नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत त्यांना अनुत्तीर्ण करता येत नाही. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. तसेच परीक्षा घेतली तरी विद्यार्थ्यांनी अनुत्तीर्ण करणार असा त्याचा अर्थ घेऊ नये.
हा निर्णय केवळ चर्चेच्या पातळीवर असून या संदर्भात शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय अंतिम केला जाणार आहे.
शाळा आणि क्रीडा हा विभाग एकत्र असायला हवा. राजकारणातील आघाड्यांमुळे मंत्री वेगवेगळे होतात; पण माझे गिरीश महाजन यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे एकत्र बैठक घेऊन काम करू.
क्रीडा आणि शिक्षण खात्याने एकत्र काम केले पाहिजे, मंत्रीही एकच असायला हवा. भविष्यात असा निर्णय झाल्यास ते फायदेशीर ठरेल, असे मत सुद्धा केसरकरांनी व्यक्त केले.