आयटीआय प्रवेशाचे अंतिम वेळापत्रक जाहीर; 6 सप्टेंबरला पहिली गुणवत्ता यादी

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशअर्ज भरण्यासाठी 15 जुलैपासून प्रारंभ झाला आहे. तब्बल 1 लाख 82 हजार विद्यार्थ्यानी आतापर्यंत नोंदणी केली आहे. त्यापैकी 1 लाख 57 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी फी भरून अर्ज कन्फर्म केले आहेत, तर त्यापैकी 1 लाख 40 हजार विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत.

आयटीआय प्रवेशाचे अंतिम वेळापत्रक जाहीर; 6 सप्टेंबरला पहिली गुणवत्ता यादी
आयटीआय प्रवेशाचे अंतिम वेळापत्रक जाहीर; 6 सप्टेंबरला पहिली गुणवत्ता यादी
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 9:22 PM

मुंबई : एकीकडे अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन मार्ग मोकळा झाला असतानाच दुसरीकडे आयटीआय प्रवेशाचे टेन्शनही दूर होणार आहे. राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण प्रवेशासंदर्भातील अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आयटीआयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रवेशाची पहिली यादी पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच्या आठवड्यात म्हणजेच 6 सप्टेंबरला जाहीर होणार आहे. उमेदवारांना 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार आहे, तसेच अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. आतापर्यंत 1 लाख 57 हजार विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज दाखल केले असून 31 vगस्टच्या अंतिम मुदतीपर्यंत ही संख्या 2 लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. (Final schedule of ITI admissions announced; First list on September 6th)

प्रवेशासाठी आतापर्यंत तब्बल 1 लाख 82 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशअर्ज भरण्यासाठी 15 जुलैपासून प्रारंभ झाला आहे. तब्बल 1 लाख 82 हजार विद्यार्थ्यानी आतापर्यंत नोंदणी केली आहे. त्यापैकी 1 लाख 57 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी फी भरून अर्ज कन्फर्म केले आहेत, तर त्यापैकी 1 लाख 40 हजार विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांचा इतर शाखांबरोबरच आयटीआयकडेही कल वाढला आहे. मोठ्या प्रमाणावर मुले-मुली चांगल्या करिअरच्या दृष्टीकोनातून आयटीआयकडे वळत आहेत. यंदाही तसाच वाढता प्रतिसाद दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांना काहीही शंका असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या काही शंका असतील, तर त्याची दखल घेण्यासही सुरुवात केली आहे. प्रवेश पद्धती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक शंका असल्यास विद्यार्थ्यांनी नजिकच्या आयटीआयमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवाराला प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही माहितीमध्ये बदलही करता येणार आहे. त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरीनंतर हरकती नोंदवता येणार आहेत. ज्या उमेदवारांनी प्रवेश अर्ज शुल्क भरलेले आहे, त्याच प्रवेश अर्जांचा पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार आहे. ज्या उमेदवारांनी प्रवेश अर्ज शुल्क भरलेले नसेल, असे अर्ज प्राप्तच झाले नाहीत, असे समजण्यात येणार आहेत. ते अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे.

प्रवेशाचे अंतिम वेळापत्रक पुढीलप्रमाणे

– ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे व अर्जामध्ये दुरुस्ती करणे – 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत

– पहिल्या फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय पर्याय व प्राधान्य सादर करणे – 31 ऑगस्ट

– प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी -2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता

– गुणवत्ता यादीसंबंधी हरकती तसेच प्रवेश अर्जातील माहितीमध्ये बदल – 2 सप्टेंबर

– संकेतस्थळावर अंतिम यादी प्रसिद्ध होण्याची तारीख व वेळ – 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता

– पहिली प्रवेश फेरी – 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता (Final schedule of ITI admissions announced; First list on September 6th)

इतर बातम्या

Satara Corona Update : सातारा जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून निर्बंध शिथिल, काय सुरु, काय बंद राहणार?

जळगावच्या सराफ बाजाराला झळाळी; सोने-चांदी खरेदीकडे गुंतवणूकदारांचा वाढता कल

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.